उभ्या ट्रकला कारची धडक, एकाचा मृत्यू तर ७ जखमी

author img

By

Published : Jun 24, 2022, 11:12 AM IST

उभ्या ट्रकला कारची धडक

वर्धा मार्गावर ट्रक आणि कारचा अपघात ( accident ) झाला. यात एका व्यक्तीच्या दुर्दैवी मृत्यू ( DEATH ) झाला. तर ७ जण जखमी ( injured ) झाले आहेत. वर्धा मार्गावर उभ्या ट्रकला कारने मागून धडक दिल्यामुळे हा अपघात झाला.

नागपूर:-वर्धा मार्गावर ट्रक आणि कारचा अपघात ( accident ) झाला. यात एका व्यक्तीच्या दुर्दैवी मृत्यू ( DEATH ) झाला तर ७ जण जखमी ( injured ) झाले आहेत. वर्धा मार्गावर उभ्या ट्रकला कारने मागून धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात श्रीनिवासराव उन्डवल्ली (48) यांचा मृत्यू झाला आहे.

या घटनेत श्रीनिवासराव उन्डवल्ली नामक इसमाचा घटनास्थळीचं मृत्यू झाला आहे. श्रीनिवासराव उन्डवल्ली हे नातेवाईकांसह कार ने वाराणसी (काशी) येथे देवदर्शनासाठी गेले होते. वाराणसी येथून नागपूर मार्गे आंध्रप्रदेशकडे परत जात असताना कार चालकाला समोर रोडलगत उभा असलेला नादुरुस्त ट्रक व्यवस्थित दिसला नाही. त्यामुळे वेगात जाणारी कार त्या ट्रकवर मागून जोरात आदळली. या अपघात कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. कारमधील सर्व जण आंध्र प्रदेशातील रहिवासी आहेत. ही घटना हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-बुटीबोरी राष्ट्रीय महामार्गावरील डोंगरगाव परिसरात घडली आहे.

जखमींची नावे पुढील प्रमाणे - सुर्यकिरण श्रीनिवासराव उन्डवंल्ली (48), रहिवासी निददावल वेस्ट गोदावरी आंध्रप्रदेश. श्रीदेवी श्रीनिवासराव उन्डवल्ली (38), रहिवासी निददावल वेस्ट गोदावरी आंध्रप्रदेश. नागलक्ष्मीदास रेड्डी (38), रहिवासी निददावल वेस्ट गोदावरी आंध्रप्रदेश. दास रेड्डी मासरेय्या (65), रहिवासी निददावल वेस्ट गोदावरी आंध्रप्रदेश. नलमुर्ती सचवानी (40), रहिवासी निददावल वेस्ट गोदावरी आंध्रप्रदेश. डोंगा शिवा (38), रहिवासी वर्ष रनिददावल वेस्ट गोदावरी आंध्रप्रदेश. लक्ष्मी निना बडी (45), रहिवासी निददावल वेस्ट गोदावरी आंध्रप्रदेश.

हेही वाचा - शिवसेना बंडखोरांच्या दिमतीला आसाममध्ये भाजप नेत्यांची टीमच.. आसामच्या मुख्यमंत्र्यांचे 'हे' पाच शिलेदार मैदानात..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.