वर्धा : दिवाळीसाठी गावी निघालेल्या कामगारांच्या वाहनाला अपघात; दोघांचा 2 मृत्यू

author img

By

Published : Nov 3, 2021, 8:49 AM IST

Updated : Nov 3, 2021, 10:25 AM IST

wardha accident

दिवाळीनिमित्त गावी जाण्यासाठी निघालेल्या मजुरांच्या मिनी ट्रॅव्हल्सला मध्यरात्रीच्या सुमारास अपघात झाल्याची घटना हिंगणघाट येथीन आजंती शिवाराजवळ घडली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला.

वर्धा - दिवाळीनिमित्त गावी जाण्यासाठी निघालेल्या मजुरांच्या मिनी ट्रॅव्हल्सला मध्यरात्रीच्या सुमारास अपघात झाल्याची घटना हिंगणघाट येथीन आजंती शिवाराजवळ घडली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला. सुभाष वतीले आणि फुलसिंग जयसिंग सयाम अशी मृतकांची नावे आहेत. राष्ट्रीय महामार्ग पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने काच फोडून जखमींना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले.

व्हिडीओ

गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने अपघात -

यवतमाळ येथील मिनी ट्रॅव्हल हे 20 ते 22 मजुरांना घेऊन मध्यप्रदेशच्या दिशेने जात होते. त्यावेळी हिंगणघाट येथून काही मजुरांना घेऊन नागपुरच्या दिशेने निघाले असताना आजंती शिवारात वाहनाला अपघात झाला. चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने ती दुभाजकावर चढली आणि पलटी झाली. त्यानंतर वाहन पलटी झाल्याची माहिती स्थानिकांनी राष्ट्रीय माहामार्ग पोलिसांना दिली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत. गाडीच्या काचा फोडून जखमींना बाहेर काढत रुग्णायात हलवले.

हेही वाचा - देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयी

Last Updated :Nov 3, 2021, 10:25 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.