तब्बल चार वर्षांनी मिळाले हरवलेले दीड तोळा सोन्याचे सौभाग्याचे लेणं.. वर्ध्यातील घटना

author img

By

Published : Jul 9, 2021, 4:55 PM IST

Updated : Jul 9, 2021, 9:27 PM IST

mangalsutra-got-after-four-years

चार वर्षांपूर्वी मुलाला शाळेत सोडून देताना हरवलेले मंगळसूत्र तब्बल चार वर्षानंतर सापडले. यामुळे महिलेला आनंद झाला. मंगळसूत्र हरवलेल्या महिलेच्या घराच्या परिसरात राहणाऱ्या महिलेला हा सोन्याचा ऐवज सापडल्याने चार वर्षानंतर तो त्याच्या मूळ मालकाला परत मिळाला. वर्ध्याच्या आदिवासी कॉलनीत हा प्रकार घडला.

वर्धा - चार वर्षांपूर्वी मुलाला शाळेत सोडून देताना हरवलेले मंगळसूत्र ते परत मिळाल्याचा आनंद कोणाला होणार नाही. वर्ध्याच्या आदिवासी कॉलनीत असाच प्रकार घडला अन् चार वर्षांनी उघडकीस आला. चार वर्षांपूर्वी सोन्याचे मंगळसूत्र एकीचे हरवले आणि दुसऱ्या एका महिलेला सापडले. ज्या महिलेला हे सापडले तिनेही प्रामाणिकपणे हक्क न गाजवता लगेच परत देण्यास होकार दिला. या घटनेचीही रामनगर पोलिसांनी नोंद घेतली आणि त्या महिलेच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे. काय घडले नेमके जाणून घेऊयात..


आदिवासी कॉलनीत राहणाऱ्या एका महिलेचे साधारण 15 ग्राम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हरवले आणि ते याच परिसरात शेजारी राहणाऱ्या महिलेकडे असल्याचा दावा केला. ज्योती पराशे असे मंगळसूत्र हरवलेल्या महिलेचे नाव आहे. चार वर्षापूर्वी ती मुलीला शाळेत सोडण्यासाठी शीतल माता मंदिर परिसरापासून जात असताना मंगळसूत्र पडले. ज्यावेळी त्या महिलेच्या लक्षात आले तेव्हा त्या महिलेने संपूर्ण शोध घेतला पण मंगळसूत्र दिसून आले नाही. अखेर हरवले आणि कधी परत मिळणार नाही, असे समजून ती आता पूर्णतः विसरली. त्यावेळी ना पोलिसात तक्रार केली ना त्याचे बिल होते. यामुळे याचा फारसा गवगवा झाला नाही आणि तेव्हा या मंगळसूत्राची किंमत साधारण 45 हजाराच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे.

तब्बल चार वर्षांनी मिळाले हरवलेले दीड तोळा सोन्याचे सौभाग्याचे लेणं
यात दिवसा मागून दिवस जात चार वर्षे लोटली. यात एके दिवशी ज्योती पराशर यांच्या घरापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर राहणाऱ्या इंदिरा जुकनाके राहतात. एक दिवस त्यांच्या गळ्यात असलेले मंगळसूत्र पाहून ज्योती पराशर यांची नजर इंदिरा यांच्या गळातील मंगळसूत्राकडे गेली. हे मंगळसूत्राचे डिजाईन हरवलेल्या त्या मंगळसूत्राप्रमाणे असल्याने ते कुठून घेतल्याचे विचारले. हे मंगळसूत्र सापडले असे उत्तर इंदिरा यांच्याकडून मिळताच चार वर्षांपूर्वी हरवलेले मंगळसूत्र हेच असावे, असे त्यांना मनोमन वाटले. यानंतर सविस्तर प्रकार सांगताच यावर तुझे असेल तर तू घेऊन जा, पण पोलिसांकडे जाऊन तिथे त्यांच्यासमोर देतो असे म्हणत दोघींनी रामनगर पोलिसात जाण्याचे ठरवले.
प्रकरण पोलिसात जाताच दोघींनी आपबीती सांगितली. इंदिरा म्हणाल्या, जेव्हा सापडले तेव्हा विचारपूस केली पण हे कोणाचे आहे हे कळले नसल्याने तसेच ठेवले. ते आज यांना देऊन उद्या जर कोणी येऊन माझे होते, असे म्हणू नये म्हणून पोलिसासमोर देतो असे म्हटल्याचे प्रामाणिकपणे कबुल केले. यामुळे पोलिसांनी ज्योती यांचा दावा कसा खरा मानायचा म्हणून जुने फोटो पाहून लॉकेट तेच असल्याची खात्री केली. शिवाय दोघी एकाच भागत राहत असल्याने हरवलेली वस्तू आणि ते ठिकाण सारखे असल्याची खात्री पटवली. यामुळे पोलिसांनी नोंद घेत ऐवज कोर्टात सादर केला असून कोर्टाच्या परवानगीने त्या महिलेला परत दिले जाणार असल्याचे तिने सांगितले.
आजच्या घडीला सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे ग्रामभर सोने पाहून जिथे अनेकांचे डोळे चक्रावून जातील. तिथे सर्वसामान्य कुटुंबातील इंदिरा यांनी सहज चार वर्षापूर्वी मिळालेली वस्तू सोने असले तरी माझी नाही. यामुळे यावर मालकी हक्क न गाजवता प्रमाणिकतेचे प्रमाण दिले. जिथे क्षुल्लक पैशाच्या वादातून लोक नाते तोडतात. तिथे प्रामाणिकपणे शेजारधर्म पाळला. हे कौतुकास्पद असल्याचेही पोलीसही म्हणाले, इमानदार लोक आजही समाजात आहेत.
Last Updated :Jul 9, 2021, 9:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.