Today Vegetables Rate : एपीएमसी मार्केटमध्ये मेथी कोथिंबीर वांगी व तोंडलीच्या दरात वाढ ; इतर भाज्यांचे दर स्थिर

author img

By

Published : Jan 23, 2023, 9:07 AM IST

Today Vegetables Rate

भाजीपाला हा रोजच्या दैनंदिनीत महत्त्वाचा भाग आहे. भाजीपाल्याच्या किमती हंगाम व वातावरणनुसार बदलत असतात. आज एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर काय आहेत, ते जाणून घेवू या.

नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत १०० जुड्यांप्रमाणे मेथीच्या दरात १८०० रुपयांची वाढ झाली आहे. कोथिंबीरच्या दरात १२०० रुपयांची वाढ झाली आहे. १०० किलोप्रमाणे वांग्याच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. तोंडलीच्या दरात १ हजार रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

Today Vegetables Rate
एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ५००० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३००० रुपये ते ३५०० रुपये, लिंबू प्रति १०० किलो २००० रुपये ते २५०० रुपये, फरसबी प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलोप्रमाणे १५०० रुपये ते १६०० रुपये, गाजर प्रति १०० किलोप्रमाणे २००० रुपये ते २८०० रुपये, गवार प्रति १०० किलोप्रमाणे रुपये ६००० ते ७००० रुपये, घेवडा प्रति १०० किलोप्रमाणे ४५०० ते ५००० रुपये दर आहेत.

काकडी नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये, कारली प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलोप्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये, कोबी प्रति १०० किलोप्रमाणे ५०० रुपये ते ६०० रुपये, कोहळा प्रति १०० किलोप्रमाणे २२०० रुपये ते २५०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलोप्रमाणे २१०० रुपये ते २४०० रुपये दर आहेत.

पडवळ प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, रताळी प्रति १०० किलोप्रमाणे ३००० रुपये ते ३५००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलोप्रमाणे ७००० रुपये ते ८००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलोप्रमाणे २३०० रुपये ते ३५०० रुपये, सुरण प्रति १०० किलोप्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० रुपये ते १४०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलोप्रमाणे ६००० रुपये ते ७००० रुपये दर आहेत.

तोंडली जाड प्रति १०० किलोप्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलोप्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, वालवड प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ५००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलोप्रमाणे ३००० रुपये ते ४००० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलोप्रमाणे २३०० रुपये ते ३००० रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलोप्रमाणे ४३०० रुपये ते ४५०० रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलोप्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये दर आहेत.

पालेभाज्या : कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते १८०० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १२०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या ३००० रुपये ते ४००० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १२०० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुड्या २५०० रुपये ते ३००० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १४०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २८०० रुपये ते ३२०० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते ८०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ९०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ३००रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये २००० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये दर आहेत.

हेही वाचा : Today Vegetables Rate : एपीएमसी मार्केटमध्ये शेवग्याच्या शेंगाच्या दरात वाढ ; इतर भाज्यांचे दर स्थिर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.