Today Vegetables Rate : एपीएमसी मार्केटमध्ये मिरचीच्या दरात वाढ; इतर भाज्यांचे दर स्थिर

author img

By

Published : Jan 25, 2023, 8:23 AM IST

Today Vegetables Rate

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत १०० किलोप्रमाणे मिरचीच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले. आजचे भाज्यांचे दर सविस्तर जाणून घेवू या.

नवी मुंबई : भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे आहेत. भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ५००० रुपये ते ६००० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो २३०० रुपये ते २८०० रुपये, फरसबी प्रति १०० किलोप्रमाणे २६०० रुपये ते ३००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलोप्रमाणे १२०० रुपये ते १४०० रुपये, गाजर प्रति १०० किलोप्रमाणे २३०० रुपये ते २८०० रुपये, गवार प्रति १०० किलोप्रमाणे रुपये ६००० ते ७००० रुपये, घेवडा प्रति १०० किलोप्रमाणे ४००० ते ५००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे १४०० रुपये ते १६०० रुपये, कारली प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये दर आहेत.

Today Vegetables Rate
एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर

एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर: कच्ची केळी प्रति १०० किलोप्रमाणे २००० रुपये ते २८०० रुपये, कोबी प्रति १०० किलोप्रमाणे ६०० रुपये ते ७०० रुपये, कोहळा प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलोप्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, पडवळ प्रति १०० किलोप्रमाणे ३१०० रुपये ते ३२०० रुपये, रताळी प्रति १०० किलोप्रमाणे ३१०० रुपये ते ३४०० रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलोप्रमाणे ६५०० रुपये ते ७००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलोप्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये, सुरण प्रति १०० किलोप्रमाणे २१०० रुपये ते २२०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये दर आहेत.

भाज्यांचे दर काय आहेत: टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे १३०० रुपये ते १६०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलोप्रमाणे ५५०० रुपये ते ६००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलोप्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलोप्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, वालवड प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ५००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलोप्रमाणे ३२०० रुपये ते ३५०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलोप्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलोप्रमाणे ४५०० रुपये ते ५००० रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलोप्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये दर आहेत.

पालेभाज्या: कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १६०० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १५०० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया १५०० रुपये ते २००० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १२०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २५०० रुपये ते ३००० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते ८०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ८०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ३०० रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये १८०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये दर आहेत.

हेही वाचा : Four Tigers left Zoological Park : गोरेवाडा प्राणी उद्यानातून चार वाघ आणि चार बिबट जामनगर प्राणी संग्रहालयात रवाना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.