धक्कादायक! गर्लफ्रेंडच्या वादातून अल्पवयीन मुलांमध्ये राडा; एकाच्या मांडीत खुपसला चाकू
Updated on: Nov 16, 2021, 5:18 PM IST

धक्कादायक! गर्लफ्रेंडच्या वादातून अल्पवयीन मुलांमध्ये राडा; एकाच्या मांडीत खुपसला चाकू
Updated on: Nov 16, 2021, 5:18 PM IST
एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाच्या मांडीवर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका १४ वर्षीय आणि दोन १७ वर्षीय अशा एकूण तीन अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ठाणे - गर्लफ्रेंडच्या वादातून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाच्या मांडीवर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका १४ वर्षीय आणि दोन १७ वर्षीय अशा एकूण तीन अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्या मुलीवरून हा वाद झाला ती सुद्धा अल्पवयीन आहे.
तीनही अल्पवयीन आरोपी फरार -
भिवंडी शहरातील हिंदुस्थानी मजीद लगत असलेल्या मूकरिशा चाळीत जखमी मुलगा कुटूंबासह राहून शिक्षण घेत आहे. तर त्याच परिसरात तिन्ही हल्लेखोर अल्पवयीन मुले राहत असून काही दिवसांपासून या अल्पवयीन मूलांमध्ये जखमी मुलाची मैत्रणी असलेल्या अल्पवयीन मुलीवरून वाद होता. त्यातच काल रात्री साडे दहाच्या सुमारास पुन्हा गर्लफ्रेंडवरून भिवंडीतील ईदगाह रोडवर वाद होऊन हाणामारी सुरु होती. त्यावेळी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगा हाणामारी सोडविण्यासाठी गेला असता, त्याला बेदम मारहाण करून एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलाने त्याच्या मांडीत चाकू भोसकला होता. यामुळे तो मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर फरार असलेल्या तिन्ही हल्लेखोर अल्पवयीन मुलांचा शोध भोईवाडा पोलिसांनी सुरु केला आहे.
Chandgad MD Drugs Case : एमडी ड्रग्सचे चंदगड कनेक्शन उघड; ढोलगरवाडीत ड्रग्ससह एकजण ताब्यात
