Question To Devendra Fadnavis: आठ वर्षाच्या चिमुकलीच्या प्रश्नांमुळं चक्क उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडचणीत, वाचा सविस्तर

Question To Devendra Fadnavis: आठ वर्षाच्या चिमुकलीच्या प्रश्नांमुळं चक्क उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडचणीत, वाचा सविस्तर
Question To Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री फडणवीस हे त्यांच्या विरोधकांना हजरजबाबी उत्तर देण्यासाठी चांगलेच प्रसिद्ध आहेत. पण ठाण्यात मात्र एका आठ वर्षाच्या चिमुकलीनं त्यांना अडचणीत आणलंय. तिचे प्रश्न ऐकून चक्क फडणवीस हैराण झाले आहेत. ही चिमुकली कोण आहे, तिनं नक्की त्यांना काय प्रश्न केलेत हे सविस्तर जाणून घेऊ या. (Annada Saket Dambre )
ठाणे Question To Devendra Fadnavis ठाण्यात आठ वर्षाच्या अन्नदा साकेत डांबरे हिने देवेंद्र फडणवीस यांना विचारलेल्या प्रश्नांमुळं चांगलीच त्यांची अडचण निर्माण झालीय. आज निरंजन डावखरे यांच्या घरी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट दिली. यावेळी अन्नदा या कोड्यात टाकणारे प्रश्न विचारून फडणवीसांना चांगलंच अडचणीत आणलंय.
राज्यातील राजकीय परिस्थिती अडचणीची : अन्नदानं उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी बोलताना म्हटलंय की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. हे आता आम्हाला चांगलंच पाठ झालंय. राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत, हे पाठ करण्यासाठी आम्हाला मोठी अडचण होतेय, असं थेट चिमुकलीनं देवेंद्र फडणवीस यांना सांगितल.ं राज्यात निर्माण होणारी राजकीय परिस्थिती ही किती अडचणीची आहे, याचा परिणाम आम्हा लहान मुलांवर किती होतो, हे दाखवण्याचा प्रयत्न करत अन्नदान डांबरे हिने चक्क देवेंद्र फडणवीस यांना बोलून दाखवलंय. (Annada Saket Dambre question to Devendra Fadnavis)
जपानवरून काय आणलं : जपानला जाऊन आमच्या दीदीसाठी काय गिफ्ट आणलं? हा देखीलप्रश्न तिनं फडणवीसांना विचारलाय. यावर फडणवीस यांना हसू आवरलं नाही. या चिमुकलीच्या गोड आवाजामुळं तिचे प्रश्नदेखील गोड वाटत आहेत. राज्यात केलेली चांगलं काम आम्हाला लक्षात राहतात, हे मात्र तिनं फडणवीसांना ऐकवलं आहे. (Devendra Fadnavis in Thane)
तुम्हाला चाणाक्ष का म्हणतात : लोकांच्या अनेक अडचणी ओळखून तुम्ही त्यांच्या अडचणी सोडवतात, हे चिमुकल्या अन्नदानं सांगितल्यावर देवेंद्र फडणवीस जोरात हसू लागले. ते निरंजन डावखरे यांच्या घरी दीड दिवसांच्या गणेशाचं दर्शन घेण्यासाठी हे ठाण्यात आले होते. त्यांनी डावखरे यांच्या भेटीनंतर भाजपा कार्यकर्त्यांच्या घरी जावून देखील गणेश दर्शन घेतलंय.
मुख्यमंत्र्यांना देखील विचारले होते प्रश्न : मागील वेळेस अन्नदा हीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट झाली होती. तेव्हा देखील मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारून तिने त्यांनादेखील विचार करण्यास भाग पाडलं होतं. अन्नदा ही कल्याणच्या सीक्रेट हार्ड स्कूलमध्ये शिकते. ती इयत्ता तिसरीत शिकत आहे. तिच्या वक्तृत्वामुळं शाळेतील सर्व शिक्षक तिच्यावर प्रेम करतात, असं तिच्या आई-वडिलांनी सांगितलंय.
हेही वाचा :
- Political leaders on Women Reservation : महिला आरक्षण विधेयकावर 'या' राजकीय नेत्यांनी केलंय मोदी सरकारचं अभिनंदन
- Devendra Fadnavis Ganesha Pranapratishtapana : पडळकरांचं वक्तव्य अयोग्यच, फडणवीसांची स्पष्टोक्ती शासकीय श्री गणेशाची केली प्राणप्रतिष्ठापना
- Devendra Fadnavis On Sanatan : सनातनला हटवण्याची मानसिकता असणाऱ्यांना ठेचून काढू - देवेंद्र फडणवीस
