पंढरपुरातील गणेशोत्सव मंडळांचा खर्चाला फाटा देत सामाजिक उपक्रमांची सांगड

author img

By

Published : Sep 19, 2021, 9:17 AM IST

Updated : Sep 19, 2021, 9:36 AM IST

पंढरी

कोरोनामुळे यंदाच्या गणेशोत्सवाचा चेहरामोहरा बदलला आहे. बहुतांश मंडळांनी सामाजिक दायित्वातून आरोग्यासंबंधित कार्यक्रमांचा सपाटा लावल्याचे दिसत आहे. पंढरपुरातील गणेश उत्सवाच्या काळात गणेश मंडळानी अनावश्यक खर्च टाळून सामाजिक उपक्रमांवर भर दिला आहे.

पंढरपूर : कोरोनामुळे यंदाच्या गणेशोत्सवाचा चेहरामोहरा बदलला आहे. बहुतांश मंडळांनी सामाजिक दायित्वातून आरोग्यासंबंधित कार्यक्रमांचा सपाटा लावल्याचे दिसत आहे. पंढरपुरातील गणेश उत्सवाच्या काळात गणेश मंडळानी अनावश्यक खर्च टाळून सामाजिक उपक्रमांवर भर दिला आहे. पंढरपूर शहरातील सहकार गणेश उत्सव मंडळ व श्री समर्थ रामदास तालीम मंडळाकडून अनावश्यक खर्चाला फाटा देत रक्तदान शिबिरासारखा उपक्रम राबवण्यात आला आहे. मंडळांनी आरोग्योत्सवासोबतच पुन्हा एकदा सामाजिक उपक्रमांना सुरुवात केली आहे.

पंढरीतील गणेश मंडळांचा सामाजिक उपक्रम

समर्थ रामदास तालीम मंडळाची रक्तदानातून सामाजिक भान

राज्यात गणेश उत्सवानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रम मंडळांकडून राबवले जातात. मात्र सध्या कोरोना पार्श्वभूमीवर गणेश उत्सव हा साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. पंढरपुरातील श्री समर्थ रामदास तालीम मंडळाकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तालीम मंडळाकडून उपक्रमावर जोर दिला जात आहे. त्यानुसार, रक्तदान शिबिरात 351 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला आहे. तालीम मंडळाकडून कोरोना योद्ध्यांचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. नैसर्गिक संकटाच्या काळात मंडळाकडून समाजोपयोगी कामे केली आहेत. सुमारे 81 वर्षाची परंपरा असलेले श्री समर्थ रामदास तालीम मंडळ आहे.

सहकार मंडळाकडून अनावश्यक खर्च टाळून उपक्रमांवर भर

राज्य सरकारकडून गणेशोत्सवानिमित्त अनेक निर्बंध घातले आहेत. राज्य सरकारच्या आदेशाचे पालन करून पंढरपुरातील गणेश उत्सव मंडळाने गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला. त्यातील होणारा खर्च हा सामाजिक उपक्रमांमध्ये लावला आहेस. पंढरपुरातील नावाजलेले सहकार गणेशोत्सव मंडळ नेहमीच सामाजिक उपक्रम राबवते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून सहकार मंडळाकडून रक्तदान शिबिर घेण्यात आले. मंडळातील विद्युत रोषणाई तसेच अनावश्यक खर्च टाळून उपक्रमावर भर दिला आहे. त्यात 400 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये शतकवीर रक्तदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सत्कार करण्यात आला. दरम्यान, 1982 पासून कार्यरत असणारे सहकार गणेश मंडळ म्हणून प्रसिद्ध आहे.

हेही वाचा - LIVE - पुण्यात सर्वच मानाच्या गणपतींचे विसर्जन मंडपातील हौदात होणार

हेही वाचा - VIDEO : आज लाडक्या बाप्पासाठी झटपट 'असे' तयार करा 'चना डाळ मोदक'

Last Updated :Sep 19, 2021, 9:36 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.