पंढरपुरात गणेश मूर्तीचे नगरपरिषदेकडून संकलन, चंद्रभागा नदी पात्रात विसर्जन बंदी

author img

By

Published : Sep 19, 2021, 7:28 PM IST

Updated : Sep 19, 2021, 9:07 PM IST

pandharpur city corporation collect ganesh murti for visarjan

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होऊ नये या उद्देशाने गणेश विसर्जनासाठी पंढरपूर नगरपरिषदेने गणेशमुर्ती संकलन केंद्रांची व्यवस्था केली होते. तरी शहरातील नागरिकांनी व सार्वजनिक गणेश मंडळांनी आपल्या नजीकच्या नगरपरिषदेच्या गणेश मुर्ती संकलन केंद्रात गणेशमुर्ती दिली.

पंढरपूर (सोलापूर) - येथे आज गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. इतिहासात पहिल्यांदाच पंढरपुरातील चंद्रभागा नदीपात्रात गणेश विसर्जनास बंदी घालण्यात आली. चंद्रभागा नदीपात्रात पोलिसांनी मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला होता. यावेळी श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती गणपतीचेही विसर्जन करण्यात आले. उत्तरपुजा व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते विधीवत संपन्न झाली.

पोलीस अधिकारी याबाबत बोलताना

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होऊ नये या उद्देशाने गणेश विसर्जनासाठी पंढरपूर नगरपरिषदेने गणेशमुर्ती संकलन केंद्रांची व्यवस्था केली होते. तरी शहरातील नागरिकांनी व सार्वजनिक गणेश मंडळांनी आपल्या नजीकच्या नगरपरिषदेच्या गणेश मुर्ती संकलन केंद्रात गणेशमुर्ती दिली. पंढरपूर तालुका प्रशासनाकडून गणेशमूर्ती विसर्जनासाठी 13 ठिकाणी बंदोबस्त करण्यात आला होता. या 13 ठिकाणी गणेशाची मूर्ती संकलन करून बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.

हेही वाचा - VIDEO : पुण्यातील हत्ती गणपतीचे विसर्जन; ड्रोनद्वारे टिपलं दृश्य

कोणत्या ठिकाणी प्रशासनाने केला बंदोबस्त -

अर्बन बँक प्रशासकीय इमारतीसमोर, भोसले चौक गणेश मंदीरासमोर, शेटे पेट्रोल पंपासमोर, के.बी.पी. कॉलेज चौक बसस्टॉप जवळ, प्रबोधनकार ठाकरे चौक, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर, स्वा. सावरकर चौक, गजानन मेडीकल समोर, शिवतीर्थ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा फुले पुतळ्यासमोर, महाद्वार चौक पोलीस चौकीजवळ, मुक्ताबाई मठासमोर, अंबाबाई पटांगणा समोर, विठ्ठल मोबाईल शॉपीजवळ, यमाई तलाव गेटजवळ, टाकळी रोड या ठिकाणी गणेश मूर्तींचे संकलन केले.

Last Updated :Sep 19, 2021, 9:07 PM IST

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.