Nandni Toll Plaza Destruction : टोल मागीतला म्हणून एसआरपीएफ जवानाची टोल कर्मचाऱ्याला मारहाण, आरोपींना अटक

author img

By

Published : Jun 5, 2022, 10:48 AM IST

टोल कर्मच्याऱ्यांना मारहान

सोलापूर विजयपूर माहामार्गावर (Vijaypur Highway)असलेल्या नांदनी टोलनाक्यावर एसआरपीफ पोलिसांने (SRPF Police) तसेच त्याच्या मित्रांनी टोल कर्मच्याऱ्यांना मारहान केली आहे. या मारहानीत 25 हजारांचे नुकसान झाले आहे.

सोलापूर - सोलापूर-विजयपूर महामार्गावर असलेल्या नांदणी टोलनाक्यावर टोल ( Solapur Vijaypur Highway ) मागितल्याच्या कारणावरुन चिडलेल्या एसआरपीएफ पोलीसाने व त्यासोबत असलेल्या 5 मित्रांनी गाडीतील तलवारीचा धाक दाखवून मारहाण ( Nandni Toll Naka Employee Beaten By Sword )केली. या मारहाणीत २५ हजाराच्या साहित्याची नासधूस केली. ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. नागेश भीमाशंकर स्वामी (रा नांदनी,ता दक्षिण सोलापूर) असे टोल कर्मचाऱ्याचे नाव असून या घटनेची तक्रार त्यांनी मंद्रुप पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 6 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून चौघांना अटक केली आहे. तसेच 2 अज्ञात आरोपींचा शोध पोलीस घेत आहे.

प्रतिक्रिया

आरोपींविरोधात गुन्हा दाखल - या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा नोंदविला (solapur Police registered a case) असून, यामध्ये रोहन सुरेश जाधव (30) रा. सैफुल, सोलापूर शहर), गजानन अण्णाराव कोळी (29) सैफुल, सोलापूर शहर, सुरज बबनराव शिकारे (31) रा सैफुल, सोलापूर शहर, तसेच शिवशंकर बबनराव शिखरे (25) रा. एसआरपीएफ कॅम्प, सोलापूर यांचा समावेश आहे. यापैकी शिवशंकर शिखरे हा राज्य राखीव पोलीस दलातील पोलीस कर्मचारी आहे. या चौघांना पोलिसांनी अटक केली असून इतर दोन अज्ञात आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

टोल कर्मचाऱ्यांना मारहाण - सहाही आरोपी हे शुक्रवारी मध्यरात्री जेवण करण्यासाठी आपल्या इनोव्हा कार (एमएच 02/एक्यू/4455) मधून सोलापूर विजयपूर महामार्गावर असलेल्या एका धाब्यावर गेले होते. मध्यरात्री सोलापूरच्या दिशेने येताना नांदनी येथील टोल नाक्यावर टोल कर्मचाऱ्यांनी टोलची मागणी केली. यावरून त्यांच्यात वाद वाढला. आम्ही पोलीस आहोत, असे सांगत त्यांनी गाडीतील तलवार काढून धाक दाखवत टोल कर्मचाऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच आरोपींनी यावेळी टोल नाक्याचीही नासधूस केली.
हेही वाचा- World Environment Day 2022: जागतिक पर्यावरण दिन; वाचा सविस्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.