Solapur : आईसह दोन मुलांचा विहीरीत बुडून मृत्यू; दक्षिण सोलापूरातील घटना

author img

By

Published : May 11, 2022, 9:48 PM IST

Mother And Two Child Drowned

दक्षिण सोलापूर तालुक्यातील आलेगाव शिवारात एका महिलेने आपल्या दोन चिमुकल्यासह आत्महत्या केल्याची घटना समोर आली ( Mother And Two Child Drowned ) आहे.

सोलापूर - दक्षिण सोलापूर तालुक्यातील आलेगाव शिवारात एका महिलेने आपल्या दोन चिमुकल्यासह आत्महत्या केल्याची घटना समोर आली ( Mother And Two Child Drowned ) आहे. विहीरीत उडी मारुन ही आत्महत्या केल्याचे समोर आले ( Mother Child Drowned Alegaon Shivar Solapur ) आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मंगळवारी मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळले - याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोनाली सिद्राम चोपडे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. संतोष सिद्राम चोपडे (वय 8 वर्ष), संदीप चोपडे (वय 5, वर्ष सर्व राहणार तिल्हेहाळ, आलेगाव शिवार, तालुका-दक्षिण सोलापूर) असे दोन्ही मुलांचे नाव आहेत. आईने या आपल्या दोन मुलांसह आलेगाव येथील शिवारातील शेत गट नंबर 30/2 चे मालक दयानंद वसंत शिंदे यांचे शेतातील विहिरीत उडी घेतली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी तिन्ही मृतदेह विहीरीतील पाण्यावर तंरगताना आढळून आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

आत्महत्येची शक्यता पोलिसांनी वर्तवली - एका आईने आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली असल्याची शक्यता वळसंग पोलिसांनी वर्तवली आहे. याबाबत अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार ही आत्महत्या आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती दिली.

हेही वाचा - Railway Ministry Advises Wear Mask : प्रवाशांनो लक्ष द्या; रेल्वे प्रवासादरम्यान मास्क वापरणे बंधनकारक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.