International Nurses Day : कोरोना महामारीत सामाजिक संकटाशी दोन हात करणाऱ्या परिचारिका

author img

By

Published : May 12, 2022, 7:42 AM IST

International Nurses Day

12 मे 1820 साली फ्लॉरेन्स नाईटेंगल यांचा इटली या देशात जन्म झाला. 1853 साली यांनी क्राईमियन युद्धा दरम्यान जखमी सैनिकांची सुश्रुशा म्हणजेच रुग्णसेवा केली होती. त्यांना लेडी विथ लॅम्प असेही म्हटले जाते. अतिशय सुखवस्तू घराण्यात जन्म होऊन देखील त्यांनी परिचारिका होत. जखमी लोकांची व सैनिकांची सेवा केली. त्यांच्या सन्मानार्थ 12 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस म्हणून साजरा केला जातो.

सोलापूर - दरवर्षी 12 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस म्हणून साजरा केला जातो. फ्लॉरेन्स नाईटिंगेल या आधुनिक परिचरिकेचा जन्मदिवस 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस म्हणून साजरा केला जातो. परिचरिकांची खरी जाणीव कोरोना महामारीत झाली. सोलापूर शासकीय रुग्णालयाचा विचार केला असता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सद्यस्थितीत फक्त 376 परिचारिका रुग्णांना सेवा देत आहेत. 2017 पासून शासनाने भरतीच घेतली नसल्याची माहिती परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा मनीषा शिंदे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

कोरोना महामारीत सामाजिक संकटाशी दोन हात करणाऱ्या परिचारिका

कोरोना आजाराचा शिरकाव झाला त्यावेळी परिचरिकांनी कोरोना महामारीशी दोन हात करत रुग्णांशी सेवा केली. कोरोना आजाराच्या भीतीने समाजाने देखील आमच्यावर बहिष्कार घातला होता. सामाजिक जीवन जगणे अवघड झाले होते. कारण कोरोना ड्युटी करते, याकारणाने लोकं आमच्या जवळ येत नव्हती. आमच्या सोबत बोलत नव्हती. तसेच आमच्या लेकरांना देखील इतर मुलांसोबत खेळायला देत नव्हती, अशी माहिती सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल मधील परिचरिकांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन विशेष - 12 मे 1820 साली फ्लॉरेन्स नाईटेंगल यांचा इटली या देशात जन्म झाला. 1853 साली यांनी क्राईमियन युद्धा दरम्यान जखमी सैनिकांची सुश्रुशा म्हणजेच रुग्णसेवा केली होती. त्यांना लेडी विथ लॅम्प असेही म्हटले जाते. अतिशय सुखवस्तू घराण्यात जन्म होऊन देखील त्यांनी परिचारिका होत. जखमी लोकांची व सैनिकांची सेवा केली. त्यांच्या सन्मानार्थ 12 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस म्हणून साजरा केला जातो. परिचारिका या व्यवसायाला आधुनिक स्वरूप दिले. सोलापुरातील परिचारिका सुद्धा फक्त हा एकच दिवस साजरा न करता 6 मे ते 12 मे असा पूर्ण सप्ताह साजरा करत विविध सामाजिक कार्य करतात.

कोविड वॉर्डात राखी पौर्णिमा साजरा केली - सोलापुरातील शासकीय रुग्णालयात कोविड वॉर्ड कोविड रुग्णांनी खचाखच भरले होते. रुग्णांसह आरोग्य खात्यावर भयंकर असा ताण निर्माण झाला होता. त्यावेळी परिचारिकांनी कोविड वॉर्डात राखी पौर्णिमा साजरा केली. अनेक पुरुष रुग्णांच्या डोळ्यांत त्यावेळी पाणी आले होते. कारण कोरोना महामारीत आपलीच लोकं परकी झाली होती. त्यावेळी कोविड उपचार घेणाऱ्या पुरुषांना बहिणीची देखील कमतरता या परिचरिकांनी पडू दिली नाही. राखीच्या या धाग्याने अनेक रुग्णांचे प्राण वाचले आणि ते बरे होऊन घरी परतले असल्याची माहिती परिचरिकांनी दिली.

पीपीई किट परिधान करून सलग ड्युटी - कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्या नंतर आणि रुग्णसंख्या वाढल्यानंतर मोठी जबाबदारी परिचरिकांवर आली होती. अनेक तास पीपीई कीट परिधान करून रुग्णांची सेवा करणे आणि रुग्णांना धीर देत, मानसिक पाठिंबा देत, रुग्णसेवा केल्याची माहिती परिचरिकांनी दिली. पीपीई किट परिधान केल्यानंतर, ड्युटी संपल्यावरच पीपीई किट काढावे लागत होते. कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक विधीला देखील परवानगी नव्हती, अशा परिस्थितीत हार न मानता अनेक रुग्णांना जीवन मरणाच्या दारातून बाहेर काढले.

हेही वाचा - पुनर्विवाहानंतर सरकारी कर्मचाऱ्याला तिसरी प्रसूती रजा; मध्य प्रदेश 'HC'चा निर्णय

समाजाने बहिष्कार केला - परिचरिका आहे, कोरोना रुग्णांची सेवा करते म्हणून समाजातील लोकांनी आमचा तिरस्कार केला. सामाजिक बहिष्कार घातला. निवासी सोसायटीमध्ये आमच्या घरी कोणी येत नव्हते. आमच्या मुलांसोबत कोणी लहान मुलं बोलत नव्हती. त्यांसोबत खेळत नव्हती. अशा बिकट परिस्थितीत देखील रुग्ण सेवा सोडली नाही. आणि रुग्णांना मानसिक आधार दिला. त्यांची सेवा केली. हळूहळू कोरोना महामारीची तीव्रता कमी झाली आणि सर्व काही व्यवस्थित झालं. पण या महामारीत सोलापूर येथे कोरोना रुग्णांची सेवा करताना रेहाना शेख आणि इनामदार या दोन परिचरिकांना कोरोनाची लागण झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. आजतागायत त्यांच्या कुटुंबियांना शासकीय अनुदानाची रक्कम मिळाली नाही. महाराष्ट्र राज्यात एकूण 12 परिचारीकांचा मृत्यू कोरोना रुग्णांची सेवा करताना कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.