सांगोल्यात शेततळ्यात पडलेल्या बायकोला वाचवायला गेला पती, दोघांचाही मृत्यू

author img

By

Published : Sep 21, 2021, 12:49 PM IST

Sangola

सांगोला तालुक्यातील धायटी येथे शेततळ्यात पाय घसरून बायको पडली. बायकोला वाचवण्यासाठी पती गेला. यात दोघांचाही मृत्यू झाला. मल्हारी बाळू पुजारी आणि शितल मल्हारी पुजारी अशी बुडून मृत्यू झालेल्या पती-पत्नीची नावं आहेत. दोन वर्षांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. त्यांना सहा महिन्यांची एक मुलगी आहे.

पंढरपूर : सांगोला तालुक्यातील धायटी येथे शेततळ्यात पाय घसरून बायको पडली. तर, बायकोला वाचवताना पतीचाही मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गोविंद नारायण पाटील यांच्या शेततळ्यामध्ये शेतकरी पती-पत्नीचा बुडून मृत्यू झाला आहे. मल्हारी बाळू पुजारी (वय 30) आणि शितल मल्हारी पुजारी (वय 22) अशी बुडून मृत्यू झालेल्या पती-पत्नीची नावं आहेत. दरम्यान, सांगोला पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

पत-पत्नीचा बुडून मृत्यू

धायटी येथील गोविंद नारायण पाटील यांच्या गटात शेततळे आहे. शितल ही साईफनचा पाईप नीट करत असताना पाय घसरून शेततळ्यात पडली. तिला वाचवण्यासाठी तिचा पती मल्हारी शेततळ्यात गेला. मात्र दोघांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलीस पाटील प्रवीण गायकवाड यांनी पोलिसात खबर दिली. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पवार करत आहेत.

दोन वर्षापूर्वीच झाला होता विवाह

गोविंद नारायण पाटील यांच्या शेततळ्यात पाय घसरून पडून या पती-पत्नीचा मृत्यू झाला. यामुळे धायटी गावावर शोककळा पसरली आहे. मल्हारी व शितल यांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता.

सहा महिन्यांची चिमुकली अनाथ

पुजारी दाम्पत्यांचा मृत्यू झाल्याने धायटी गावावर शोककळा पसरली आहे. सर्वात दुःखद म्हणज शितल-मल्हारी यांना सहा महिन्याची एक मुलगी आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा - धक्कादायक : महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला; सुसाईड नोट सापडली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.