Youths of Solapur Died in Accident : सोलापूरच्या चार तरुणांचा भीषण अपघातात मृत्यू; तिरुपती दर्शनानंतर परतताना काळाचा घाला

Youths of Solapur Died in Accident : सोलापूरच्या चार तरुणांचा भीषण अपघातात मृत्यू; तिरुपती दर्शनानंतर परतताना काळाचा घाला
तिरुपतीला दर्शनसाठी गेलेल्या सोलापूर शहरातील चार तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहिती समोर आली आहे. तवेरा चारचाकी कार दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात चारजण ठार, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
सोलापूर : सोलापूर शहरातील चार तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तवेरा गाडी दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात चारजण ठार, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. चंद्रगिरी मंडळातील नायडूपेट-पूथलापट्टू मुख्य रस्त्यावर ही घटना घडली आहे.
तिरुपती दर्शनावरून परतताना काळाचा घाला : महाराष्ट्र राज्यातील सोलापूर शहर येथील नऊ जणांचा जथ्था तिरुमला येथे दर्शन घेऊन कानिपकमकडे जात असताना हा अपघात झाला आहे. सोलापूर शहरातील जुळे सोलापूर या सोसायटीत राहत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
भीषण अपघातामध्ये मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता : ऋषिकेश, मयूर, अजय, रोहन, राहुल, श्रीनार्लेकर, अंतरवू, सुनील आणि अंबादास अशी मृतांची नावे असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. मृतांचा आकडा वाढला जाऊ शकतो असेही सांगितले जात आहे. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून तिरुपती रुईया रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पश्चिम डीएसपी नरसप्पा रुया रुग्णालयात पोहोचले. चंद्रगिरी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
