Ganeshotsav 2022 कोकणातील मातीला सोलापुरी हात देत पर्यावरण पूरक गणेश मूर्ती तयार

author img

By

Published : Aug 29, 2022, 5:31 PM IST

Eco Friendly Ganesha

सोलापुरातील काही तरुणांनी एकत्र येऊन कोकणातील मातीला सोलापुरी हात देत पर्यावरण पूरक गणेश मूर्ती तयार केली आहे. एक प्रकारे इको फ्रेंडली गणेश मूर्तीचा Eco Friendly Ganesha Idol पर्याय उपलब्ध करून दिला आहे. कोकणातील आणलेल्या लाल मातीतून श्रींच्या मूर्ती तयार केल्या आहेत. कोकणातील मातीला सोलापुरी हात देत पर्यावरण पूरक गणेश मूर्ती साकरली जात आहे. Eco Friendly Ganeshotsav

सोलापूर सोलापुरातील काही तरुणांनी एकत्र येऊन कोकणातील मातीला सोलापुरी हात देत पर्यावरण पूरक गणेश मूर्ती Eco Friendly Ganesha Idol तयार केली आहे. एक प्रकारे इको फ्रेंडली गणेश मूर्तीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. कोकणातील आणलेल्या लाल मातीतून श्रींच्या मूर्ती तयार केल्या आहेत. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पर्यावरण पूरक गणेशोत्सवाची संकल्पना Eco Friendly Ganeshotsav राबवत असल्याची माहिती दिली. मूर्तिकार विनायक घाटगे, आशिष माशाळे व यांची टीम पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे.

कोकणातील मातीला सोलापुरी हात देत पर्यावरण पूरक गणेश मूर्ती तयार



कोकणातील लाल माती लवकर विघटन होते गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. कोरोना महामारीचे संकट दूर झाल्या पासून सर्वसामान्य नागरिक सामान्य जीवन जगत आहेत. सहज बनविता येणाऱ्या पीओपीच्या मूर्ती मूर्ती बनविण्याचे प्रमाण जास्त आहे. प्रशासनाने घरगुती मूर्ती सार्वजनिक मूर्तीच्या उंचीसाठी नियमावली जाहीर केली आहे. सोलापूर येथील काही विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक गणेश मूर्तीसाठी विशेष प्रयत्न केला आहे. त्यासाठी त्यांनी कोकणातील लाल माती सोलापुरात आयात केली आहे. शाडूच्या माती पेक्षा लाल मातीचे लवकर विघटन होते अशी माहिती यावेळी देण्यात आली.तर कोरीव कामासाठी दोन तास असे श्रींची लाल मातीची मूर्ती बनविण्यासाठी साडेचार ते पाच तास लागतात असल्याची माहिती विनायक घाटगे यांनी दिली. मातीच्या लाल रंगावर चकाकी आणि गडदपणा आणण्यासाठी कावचा थर देण्यात येतो.


कोकणातील लाल मातीला सोलापुरी हात सोलापूर शहर आणि जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पूरक साजरा करण्यासाठी कोकणातील लाल मातीला प्राधान्य देत लाल मातीचे सोलापूर येथे आणून त्याला सोलापुरी हात देण्यात आला आहे. लाल मातीपासून तयार केलेल्या श्रींच्या मूर्ती पासून पर्यावरणाला कोणत्याही प्रकारचा नुकसान होणार नाही याची विशेष काळजी घेण्यात आली आहे.



तुळशी गणेश मूर्ती सोलापूर येथील मूर्तिकारांनी तुळशी गणेश मूर्ती तयार केल्या आहेत. घरातील कुंडीत किंवा बादलीत श्रींच्या मूर्तीचे विसर्जन केल्या नंतर त्या मातीतून तुळशीचे रोप उगवेल.श्रींची मूर्ती तयार करताना मातीत तुळशीच्या बिया मिसळून पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनविल्या आहेत.

हेही वाचाGanesh Chaturthi Puja 2022 बुधवारी या शुभ मुहूर्तावर होणार गणेशाचे आगमन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.