कानाच्या खाली नाही मारणार, बाकी अवयव आहेत ना... नारायण राणे

author img

By

Published : Aug 28, 2021, 9:22 PM IST

Updated : Aug 28, 2021, 9:43 PM IST

नारायण राणे

विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार, कालिदास कोळंबकर, नितेश राणे व माजी खासदार निलेश राणे आदी नेते दौऱ्यात सहभागी झाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत आणि खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका केली आहे.

सिंधुदुर्ग - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यात पुन्हा एकदा शिवसेनेच्या नेत्यांना लक्ष्य केले आहे. माझ्या नेत्यांनी दिल्लीहून परवा फोन करून कोणाच्या कानाखाली नाही मारायचे, असे सांगितले. मात्र, मी कानाच्या खाली मारणार नाही. बाकी अवयव आहेत ना ? कोर्टानेही माझ्याकडून लिहून घेतल्याचे नारायण राणेंनी कार्यक्रमात सांगितले.

कणकवलीतुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा दौरा सुरू झाला. देवगड, मालवण, सावंतवाडीत राणेंनी या दौऱ्याच्या निमित्ताने जनतेशी संवाद साधला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार, कालिदास कोळंबकर, नितेश राणे व माजी खासदार निलेश राणे आदी नेते दौऱ्यात सहभागी झाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत आणि खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका केली आहे.

हेही वाचा-प्रतिदिन १० लाख वसुलीचे पुणे मनपाचे टार्गेट; व्यापाऱ्यांकडून तीव्र विरोध

खासदार संजय राऊत यांच्यावर टीका

राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली. राणे म्हणाले, की संजय राऊत हे राज्यसभेत भेटल्यानंतर वेलडन म्हणतात. बाहेर जाऊन टीका का करतो असे विचारले असता हे राजकारण असल्याचे सांगतात. संजय राऊत हे उद्धव ठाकरेंसोबत आहेत की पवारांसोबत हा प्रश्न आहे. राणेजी मी तुमच्या सोबत असे त्यांनी म्हटल्यावर मग पवार साहेबांचे काय असे विचारले. रोज त्यांच्या ऑफिसमध्ये बसलेले असतात. ते काय बोलण्याच्या लायकीचेदेखील नाहीत, असे राणे म्हणाले.

हेही वाचा-Video : उगाच पलटन वाढू नका, दोनच अपत्यांवर थांबा - अजित पवार



खासदार विनायक राऊत यांचाही घेतला समाचार

केंद्रीय मंत्री राणे यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावरही टीका केली. मी विमानातून दिल्लीत उतरताना हे दुसरे राऊत आले. राऊत म्हणाले, साहेब तुमच्यासोबत कोणी नाही का ? नाहीतर मी बॅग काढतो तुमची. एवढी वेळ माझी बॅग काढणारा माझ्यावर टीका करतो. हमालाची कमीच असल्याने बॅग काढायला सांगणार होते. मी कधी कोणाला त्रास दिलेला नाही किंवा चुकीचा वागलेलो नाही. आम्ही व्यावसायिक आहोत. मात्र विनायक राऊत काहीच करत नाही. मी कुणाशी चुकीचे वागलो नाही. कुणाशी गैरव्यवहार केला नाही. भ्रष्टाचार केला नाही. उदाहरण दाखवून द्या, उद्या राजकारण सोडतो, असे राणे यांनी आवाहन केले.

हेही वाचा-नारायण राणेंचे मानसिक स्वास्थ्य ठीक व्हावे म्हणून शिवसैनिकांनी प्रार्थना करावी - संजय राऊत
पोलीस अधीक्षकांकडून भेटीचे प्रयत्न-
अटक करायला आलेले पोलीस अधीक्षक मी उठून उभा राहून कापायला लागले. काल पुन्हा दौरा सुरू केला तर भेटायचं आहे म्हणून आमच्या माणसांना सांगायला लागल्याचेही राणे यावेळी म्हणाले.

दरम्यान, राणेंच्या टीकेचा सूर कायम दिसून आला आहे. स्वतःच्या खात्यासह केंद्राच्या योजना सांगण्यावरही त्यांनी भर दिला आहे.

राणेंनी मुख्यमंत्र्यांवर केली होती टीका

देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना माहिती नाही. कुणाला तरी विचारतात हिरक महोत्सव आहे काय? मी असतो तर कानाखाली चढवली असती. अशी टीका भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली होती. त्यानंतर राणेंना अटक झाली होती. न्यायालयाने राणे यांची जामिनावर सुटका केली आहे.

Last Updated :Aug 28, 2021, 9:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.