st workers strike : अनिल परबांच्या घरात एसटी कामगार घुसणारच ही सुरुवात आहे - आमदार नितेश राणे

author img

By

Published : Nov 23, 2021, 5:02 PM IST

Updated : Nov 23, 2021, 6:01 PM IST

mla nitesh rane

ज्यांनी कामगारांची घरे उध्वस्त केली आहेत त्यांच्या घरात कामगार घुसणारच, अशी टीका आमदार नितेश राणे (mla nitesh rane) यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर केली. ते कणकवलीत माध्यमांशी बोलत होते. (mla nitesh rane criticize transport miniter anil parab)

सिंधुदुर्ग - परिवहनमंत्री अनिल परब (transport minister anil parab) यांच्या घरावर शाईफेक ही तर सुरुवात आहे. यापेक्षाही टोकाची भूमिका एसटी कामगार (st workers) घेणार आहेत. तो निर्लज्ज माणूस आहे. हाकेच्या अंतरावर असलेल्या आझाद मैदानातील एसटी कर्मचाऱ्यांची भेट त्यांनी घेतली नाही. ज्यांनी कामगारांची घरे उध्वस्त केली आहेत त्यांच्या घरात कामगार घुसणारच, अशी टीका आमदार नितेश राणे (mla nitesh rane) यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर केली. ते कणकवलीत माध्यमांशी बोलत होते. (mla nitesh rane criticize transport miniter anil parab)

...तर मला आश्चर्य वाटणार नाही -

हाकेच्या अंतरावर असलेल्या आझाद मैदानातील एसटी कर्मचाऱ्यांची भेट त्यांना घेतली नाही. नुसती शाई का? याच्यापेक्षा ही टोकाची भूमिका घेतली तर मला आश्चर्य वाटणार नाही. असे म्हणत आमदार नितेश राणे यांनी एसटी कर्मचार्‍यांच्या कृतीचे समर्थन केले आहे. सरकारने एसटी कर्मचाऱ्यांची घरी उध्वस्त केली आहेत त्यामुळे त्यांचा उद्रेक होणारच, असेही आमदार नितेश राणे यावेळी म्हणाले.

हेही वाचा - ST Worker Strike : संपावर निघणार तोडगा? राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना चर्चेसाठी निमंत्रण

मंत्री अनिल परब यांच्या घराबाहेर नेमकं काय घडलं -

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरुन बेमुदत संपाला अनेक संघटनेनं पाठिंबा जाहीर केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन आता चिघळण्याच्या मार्गावर असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातील जनशक्ती संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहेत. जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज परिवहनमंत्री अनिल परब यांच्या घराबाहेर गोंधळ घातला. परब यांच्या घरावर शाई फेकण्याचा प्रयत्नही या कार्यकर्त्यांनी केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवले. तेव्हा रस्त्यावर झोपून त्यांनी आपला निषेध व्यक्त केला. त्यावेळी पोलिसांनी जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

Last Updated :Nov 23, 2021, 6:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.