Sindhudurga Crime News : सिंधुदुर्गात जमिनीच्या वादातून जेसीबीने घर केले जमीनदोस्त

author img

By

Published : Jan 9, 2023, 3:22 PM IST

Sindhudurga Crime News

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात जमिनीच्या वादातून एकाने घर जमीनदोस्त केले. (House demolished by JCB). याप्रकरणी भा.द.वि. कलम 447, 380, 427 व 34 अन्वये चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. (House demolished by JCB due to a land dispute) (Sindhudurga Crime News).

सिंधुदुर्ग : वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी-हरिचरणगिरी येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. जमिनीच्या वादातून जमीन मालकाने रविंद्र कोरगावकर यांचे राहते घर थेट जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केले. (House demolished by JCB). याप्रकरणी संबंधित घर मालकाचा मुलगा रूपेश याने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे. त्यानुसार रमण खानोलकर, शैलेश खानोलकर, रमण यांचा मुलगा व जेसीबी चालक अशा चौघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराबाबत ग्रामस्थांनी सुद्धा तीव्र नाराजी व्यक्त केली असून संबंधित व्यक्तीला न्याय देण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. (House demolished by JCB due to a land dispute) (Sindhudurga Crime News).

वायंगणी-हरीचरणगिरी येथील रूपेश रविंद्र कोरगांवकर याने वेंगुर्ले पोलीसांत दिलेल्या पहिल्या तक्रारीत आपले जुने घर वायंगणी ग्रामपंचायत घर नंबर 659 हे आपले वडील रविंद्र शिवराम कोरगांवकर यांच्या नावे आहे. वायंगणी-हरीचरणगिरी येथे राहणारे रमण खानोलकर हे वारंवार आमच्या घरी येऊन तुमचे घर माझ्या जमिनीत आहे, ते खाली करा नाहीतर पाडून जमिनदोस्त करणार अशी धमकी देत असत. 7 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान रमण खानोलकर त्याचा पुतण्या शैलेश खानोलकर व रमण खानोलकर यांचा मुलगा सर्व राहणार हरिचरणगिरी वायंगणी हे जेसीबी घेऊन त्या जमिनीत आमचे वायंगणी ग्रामपंचायत नंबर 659 जवळ आले असता माझे आई-वडील हे त्या ठिकाणी जावून, आमचे घर पाडू नका असे त्यांना सांगितले.

सायंकाळी सुमारे 7.30 वाजता हे घर पाडून जमिनदोस्त केल्याचे दिसून आले. तसेच घरात ठेवलेले किंमती सोन्याचे दागिने व जुनी भांडी व कागदपत्रे चोरून नेल्याचे लक्षात आले. तक्रारीनुसार भा.द.वि. कलम 447, 380, 427 व 34 अन्वये चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. सदरची तक्रार वेंगुर्ले पोलीसांत दि. 7 रोजी रात्रौ. 10 वाजता देताना रूपेश कोरगांवकर यांना न्याय मिळावा या उद्देशाने गावातील माजी पंचायत समिती सदस्य समाधान बांदवलकर, सामाजिक कार्यकर्ते योगेश तांडेल, एकनाथ राऊळ, वायंगणी सरपंच सुमन कामत, उपसरपंच हर्षद साळगांवकर, दाभोली ग्रामपंचायत सदस्य श्रीकृष्ण बांदवलकर, वैभव हळदणकर, मनोज गोवेकर, श्यामसुंदर मुणनकर, अर्जुन कोरगांवकर, बाळासाहेबांची शिवसेनेच तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, ठाकरे शिवसेनेचे वेंगुर्ले शहर प्रमुख अजित राऊळ, अवि दुतोंडकर, काका आकेरकर, नरेश बोवलेकर, आडेली ग्रामपंचायत सदस्य तात्या कोंडसकर, श्री. बांदिवडेकर, दिपक कुंडेकर आदी वेंगुर्ले पोलीस स्टेशनच्या ठिकाणी दाखल झाले होते. या प्रकरणांत दाभोली व वायंगणी या दोन्ही गावातील लोक रूपेश कोरगांवकर यांना न्याय मिळवून देण्यासाठी एकवटलेले असून त्याचा एक भाग म्हणून अन्याय होत असल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.