राणेंच्या यात्रेत नियमांचे उल्लंघन; सिंधुदुर्गात शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे

author img

By

Published : Aug 28, 2021, 12:25 PM IST

राणेंच्या यात्रेत नियमांचे उल्लंघन; सिंधुदुर्गात शिवसेना-भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हे

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रादरम्यान जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाल्याप्रकरणी आमदार वैभव नाईक आणि आमदार नारायण राणेंसह शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांवर कणकवलीत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रादरम्यान जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाल्याप्रकरणी आमदार वैभव नाईक आणि आमदार नारायण राणेंसह शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांवर कणकवलीत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

राणेंच्या यात्रेत नियमांचे उल्लंघन

कणकवलीत काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा दाखल झाली होती. यावेळी राणेंचे स्वागत करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. तसेच नरडवे नाका येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्त्यांनी गर्दी करत घोषणाबाजीही केली होती. यावेळी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाल्याप्रकरणी आमदार वैभव नाईक आणि आमदार नितेश राणे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरही गुन्हा
सिंधुदुर्गात लागू असलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे, शिवसेना आमदार वैभव नाईक, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह 50 ते 60 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही पक्षांच्या नेते आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे दाखल झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आमदार वैभव नाईक, सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे, नगरसेवक कन्हैया पारकर यांच्यासह कुडाळ, मालवण व कणकवली तालुक्यातील कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
आमदार नितेश राणे व निलेश राणेंवर गुन्हा
तर भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदेश सावंत, नगराध्यक्ष समीर नलावडे, सभापती मनोज रावराणे, राकेश परब, दिलीप तळेकर, संदीप मेस्त्री, मेस्त्री अण्णा कोदे यांच्यासह ४० ते ५० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

हेही वाचा - खासदार संजय राऊत आणि केंद्रीय राज्यमंत्री डाॅ. पवार आज नाशकात; राऊतांचा अचानक दौरा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.