ETV Bharat / state

Tiger Nails of Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवरायांची वाघनखं लवकरच सातार्‍यात; शिवप्रेमींना पाहण्यासाठी ठेवणार संग्रहालयात

Tiger Nails of Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक वाघनखं भारतात आणल्यानंतर शिवप्रेमींना पाहण्यासाठी काही काळ ती सातार्‍यातील संग्रहालयात ठेवली जाणार आहेत. यासंदर्भात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केलेली विनंती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मान्य केलीय.

Tiger Nails of Chhatrapati Shivaji Maharaj

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 17, 2023, 7:45 PM IST

सातारा Tiger Nails of Chhatrapati Shivaji Maharaj : लंडनच्या म्युझियममध्ये (London Museum) असलेली छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक वाघनखं भारतात आणल्यानंतर सातार्‍यातील वस्तुसंग्रहालयात ठेवावीत, अशी मागणी आमदार शिवेेंद्रराजे भोसले यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारांकडे केली होती. याला मुनगंटीवारांनी संमती दिलीय. यामुळं शिवरायांच्या पराक्रमाचा अनमोल ठेवा सातार्‍यातील शिवप्रेमींना पाहता येणार आहे.

शिवप्रेमींसाठी ऐतिहासिक पर्वणी : सातार्‍यातील प्रतापगडाच्या पायथ्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध करून स्वराज्यावरील आक्रमण परतवून लावले होते. अफजलखान वधामध्ये शिवरायांनी वाघनखांचा वापर केला होता. ती वाघनखं 1824 मध्ये इंग्रजांनी लंडनला नेली. तब्ब्ल 199 वर्षांनी ती वाघनखं भारतात येणार आहेत. केवळ तीन वर्ष हा अनमोल ठेवा भारतात राहणार असून महाराष्ट्रातील शिवप्रेमींना ती वाघनखं पाहता यावीत, यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि नागपूर येथील वस्तुसंग्रहालयात ठेवण्याचा निर्णय सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी जाहीर केला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील शिवप्रेमींसाठी ती ऐतिहासिक संधी ठरणार आहे.

वाघनखं लवकर मराठ्यांच्या राजधानीत : मराठ्यांची राजधानी असलेल्या सातार्‍यात वाघनखं येणार नसल्यानं सातारकर आणि शिवप्रेमींमधून नाराजी व्यक्त होत होती. परंतु, आता सातारकर शिवप्रेमींना शिवरायांची वाघनखं पाहण्याची संधी आमदार शिवेंद्रराजेंच्या प्रयत्नांमुळे मिळणार आहे. शिवेंद्रराजेंनी मुनगंटीवारांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत, सातार्‍यातील शिवप्रेमींना शिवरायांची वाघनखं पाहता यावतीत, यासाठी ती सातार्‍यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात ठेवावी, अशी मागणी केली. शिवेंद्रराजेंची विनंती तात्काळ मान्य करून वाघनखं सातार्‍यात पाहण्यासाठी आणली जातील, अशी ग्वाही मुनगंटीवारांनी दिलीय.

वाघनखांचंं होणार वाजत-गाजत स्वागत : ऐतिहासिक पराक्रमाचा ठेवा असलेली वाघनखं सातार्‍यात येण्याचा मार्ग मोकळा झालाय. त्यामुळं शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ज्या दिवशी वाघनखं सातार्‍यात आणली जातील, त्या दिवशी वाजत-गाजत आणि जल्लोषात वाघनखांचं स्वागत केलं जाईल, असं आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितलंय. तसंच त्या दिवशीच्या ऐतिहासिक सोहळ्यात जिल्ह्यातील तमाम शिवप्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहन देखील त्यांनी केलंय.

हेही वाचा :

  1. Wagh Nakhe Jagadamba Sword : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं लवकरच येणार मायभूमीत; मंत्री मुनगंटीवारांची 'ETV भारत'ला Exclusive माहिती
  2. Shivaji Maharaj Jagdamba Sword : काय आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगदंब तलवार आणि वाघनखांचा इतिहास, जाणून घ्या सविस्तर माहिती
  3. Maharashtra Political Crisis : शरद पवारांनी प्रीतिसंगमावरून भाजपवर साधला निशणा, म्हणाले..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.