महाबळेश्वर : अल्पवयीन मुलीवरील अत्याचार; 13 जणांवर गुन्हा

author img

By

Published : Sep 24, 2021, 6:52 PM IST

physical assault

आबा हनुमंत गायकवाड (वय ३०) व आशुतोष मोहन बिरामणे यांना अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली. या दोघांना सातारा येथील जिल्हा विशेष सत्र न्यायालयाने २७ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सातारा - महाबळेश्वरजवळ राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने लौंगिक शोषणातून एका बाळाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. नवजात अर्भक मुंबईच्या व्यापाऱ्याला दत्तक देण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी महाबळेश्वर पोलिसांनी माजी नगराध्यक्षाच्या दोन मुलांसह 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दोघांना कोठडी
सागर उर्फ आबा हनुमंत गायकवाड (वय ३०) व आशुतोष मोहन बिरामणे यांना अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली. या दोघांना सातारा येथील जिल्हा विशेष सत्र न्यायालयाने २७ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या आणखी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असा घडला प्रकार
महाबळेश्वर परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर आबा हनुमंत गायकवाड आणि आशुतोष मोहन बिरामणे यांनी लौंगिक अत्याचार केले. त्यामध्ये पीडित मुलगी गरोदर राहिली. १३ सप्टेंबरला घरीच या मुलीची प्रसूती झाली. त्यानंतर या नवजात मुलीच्या जन्माबाबतची माहिती लपवण्याचा हेतूने त्यांनी मुंबई येथील चौरसिया कुटुंबियांना दत्तक दिले.

संशयितांमध्ये पिडीतेचे नातेवाईकही
पीडित मुलीने व तिच्या कुटुंबियांनी सर्व हकीकत पोलिस उपअधीक्षक डॉ. शितल जानवे यांना सांगितली. पीडित मुलीच्या आईने महाबळेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सागर उर्फ आबा हनुमंत गायकवाड व आशुतोष मोहन बिरामणे यांना अटक केली. अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारात आणखी काहींचा सहभाग होता. त्यामुळे महाबळेश्वर पोलिसांनी सखोल तपास सुरु केला. या कालावधीत पीडित अल्पवयीन मुलगी ही गरोदर असूनही तिची प्रसूती घरी केली. तसेच माहिती लपवून दत्तकास संमती दिल्याप्रकरणी पिडीतेच्या नातेवाईकांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

गुन्हा लपविण्यासाठी दिले दत्तक
सनी उर्फ सत्चित दत्तात्रय बावळेकर याने नवजात मुलीच्या जन्माची माहिती लपवण्याच्या हेतूने दत्तक पत्रासाठी स्वतःच्या नावाचा बॉंड विकत घेतला. सनी बावळेकर याने त्याचा मित्र आनंद हिरालाल चौरसिया यांच्या मध्यस्थीने सुनील हिरालाल चौरसिया (दत्तक पिता) व पूनम सुनील चौरसिया (दत्तक आई, रा. कांदिवली मुंबई) यांना दत्तक प्रक्रियेचा अवलंब न करता दत्तक देण्यात आले.

पुरोहित आणि वकीलही गोत्यात

योगेश दत्तात्रय बावळेकर (रा. महाबळेश्वर), मंजूर रफिक नालबंद, अनुभव कमलेश पांडे यांना नवजात मुलगी कोणत्या प्रकारे व कशी जन्मली याची माहिती होती. तरीही माहिती लपवून त्यांनी दत्तक पत्रावर सह्या केल्या. संजयकुमार जंगम यांनी धार्मिक विधीचे पौराहित्य केले. नवजात बालक हे अनैतिक संबंधातून झालेले आहे. तसेच नवजात बालकाची आई अल्पवयीन आहे याची माहिती असतानाही संगनमत करून अवैधरित्या दत्तक दिले. ऍडव्होकेट नोटरी काम करणारे घनशाम फरांदे याने नवजात बालक हे चौरसिया कुटुंबियांना देण्यात नोटरी करून गुन्ह्यात सहकार्य केले. अॅड. प्रभाकर रामचंद्र हिरवे हे वकील यासह 13 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा - पुन्हा घंटा वाजणार.. राज्यातील शाळा 4 ऑक्टोबरपासून होणार सुरू, मात्र.. शिक्षणमंत्र्यांनी सांगितली नियमावली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.