महिलांच्या अत्याचारावर गृहमंत्री तोंडसुद्धा उघडेनात; चित्रा वाघ साताऱ्यात कडाडल्या

author img

By

Published : Sep 25, 2021, 9:35 PM IST

Chitra Wagh visit Mahabaleshwar victim girl

महाराष्ट्राला दोन दोन गृहराज्यमंत्री असताना राज्यात महिला अत्याचारांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. सातारा जिल्ह्यातच बलात्काराच्या पाच घटना समोर आल्या. त्यावर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी चकार शब्द काढला नाही. आता महाबळेश्वरच्या अत्याचार प्रकरणात ते म्हणतात आरोपींना सोडणार नाही, पण किमान त्यांना आधी पकडा तरी साहेब, असे विधान भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केले.

सातारा - महाराष्ट्राला दोन दोन गृहराज्यमंत्री असताना राज्यात महिला अत्याचारांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. सातारा जिल्ह्यातच बलात्काराच्या पाच घटना समोर आल्या. त्यावर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी चकार शब्द काढला नाही. आता महाबळेश्वरच्या अत्याचार प्रकरणात ते म्हणतात आरोपींना सोडणार नाही, पण किमान त्यांना आधी पकडा तरी साहेब, अशा शब्दांत भाजप महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी गृहराज्यमंत्री देसाई यांच्यावर निशाणा साधला.

माहिती देताना भाजप नेत्या चित्रा वाघ

हेही वाचा - कराडच्या वाखान परिसरात महिलेचा निर्घृण खून, पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी, सीसीटीव्ही तपासणार

बावळेकर यांना सहआरोपी करा

महाबळेश्वर येथे पीडित मुलीची वाघ यांनी आज भेट घेऊन कुटुंबीयांना धीर दिला. तसेच, महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमाताई खापरे यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची महाबळेश्वरमध्ये भेट घेतली. चित्रा वाघ यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रय बावळेकर यांना सहआरोपी करण्याची जोरदार मागणी केली.

महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष हे कुठल्या पक्षाचे आहेत हे न पहाता त्यांनाही सहआरोपी पोलिसांनी का केलेले नाही. दत्तात्रय बावळेकर यांच्यासमोर दत्तक विधान होत असेल तर, सहआरोपी करण्यात यावे. त्यांच्या मुलाची वकिलीची सनद रद्द करण्यात यावी, अशी मागणीही चित्रा वाघ यांनी केली.

दोन - दोन राज्यमंत्री आहेत कुठे?

चित्रा वाघ पुढे म्हणाल्या, महिला अट्रॉसिटी प्रकरणात शंभूराजेंनी कोणाला सोडणार नाही, असे वक्तव्य केले आहे. त्यांना मला विचारायचे आहे की, त्यांनी आतापर्यंत कोणाला पकडले आहे, हे जाहीर करावे. सातारा जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत महिलांवर अत्याचाराचे पाच प्रकार घडले. त्या घटनांवर राज्याचे गृहराज्यमंत्री काहीच बोलले नाहीत. राज्याला दोन गृहराज्यमंत्री आहेत. हे दोन्ही राज्यमंत्री आहेत कुठे? राज्यात हाहाकार माजला आहे. कधी बोटभर प्रतिक्रिया या दोन्ही गृहराज्यमंत्र्यांनी दिली नाही.

महिला अत्याचाराच्या घटनांत वाढ

राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांची टक्केवारी 13.2 एवढी आहे. संजय राऊत तुम्ही विरोधकांचे थोबाड फोडायची भाषा करता. राज्यात महिलांवर अत्याचार वाढलेत. तुमच्यात आहे का हिंमत सरकारचे थोबाड फोडायची, असा सवालही चित्रा वाघ यांनी केला. यावेळी भाजपच्या जिल्हाध्यक्ष सुरभी भोसले, सुनेशा शहा, नेहा खैरे यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

हेही वाचा - UPSC 2020 Result : कराडच्या तुषार देसाईची UPSC परीक्षेत बाजी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.