Sangli Crime : चोरट्याने मंदीरात केली चोरी , पण मशिदीत मात्र चोरी करतानाच पकडले

author img

By

Published : Sep 23, 2022, 5:36 PM IST

thief caught In Sangli

मंदिरामध्ये चोरी केली (thief stole from temple) आणि मशीदीमध्ये चोरी करताना चोरटा सापडला आहे. सांगलीमध्ये शहर पोलिसांनी मंदिरामध्ये चोरी करणाऱ्या मशिदीमध्ये चोरीच्या प्रयत्नात असताना अटक केली thief caught stealing from mosque आहे. असिफ डांगे ,असे या अट्टल चोरट्याचं नाव असून त्याच्याकडून तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सांगली : मंदिरामध्ये चोरी केली (thief stole from temple) आणि मशीदीमध्ये चोरी करताना चोरटा सापडला आहे. सांगलीमध्ये शहर पोलिसांनी मंदिरामध्ये चोरी करणाऱ्या मशिदीमध्ये चोरीच्या प्रयत्नात असताना अटक केली thief caught stealing from mosque आहे. असिफ डांगे,असे या अट्टल चोरट्याचं नाव असून त्याच्याकडून तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


दानपेटी फोडून मुद्देमाल लंपास - मिरज तालुक्यातल्या बुधगाव येथे काही दिवसांपूर्वी हनुमान मंदिरामध्ये चोरी झाल्याचा प्रकार घडला होता. दानपेटी फोडून चोरट्याने मुद्देमाल लंपास केला होता. याप्रमाणे सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील झाला होता. हा चोरटा मंदिरातून चोरी केल्यानंतर मशिदीमध्ये चोरी करण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. असिफ डांगे, असे या सराईत चोरट्याचं नाव असून तो शिराळा तालुक्यातल्या आरळा येथील राहणारा आहे.



संशयित आसिफ याने बुधगाव येथील हनुमान मंदिरातील काही दिवसांपूर्वी चोरी केली होती. या घटनेनंतर सांगली शहरातल्या स्टेशन चौक येथील मदिना मशीद 20 सप्टेंबर मंगळवारी आला होता. यावेळी मशिदीमध्ये मोबाईल चोरीच्या प्रयत्नामध्ये संशयितरित्या फिरत असल्याचं तेथील काही जणांना आढळून आले. त्यानंतर मशिदीतल्या लोकांनी सांगली शहर पोलिसांना याची माहिती दिली. शहर पोलिसांनी मशिदीमध्ये धाव घेत, संशयित असिफ याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्याने बुधगाव मधल्या हनुमान मंदिरातल्या चोरीची कबुली दिली आहे. त्याचबरोबर असिफ हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याने यापूर्वी रत्नागिरी येथे देखील एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याचा समोर आला (thief caught In Sangli ) आहे.

तीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत - शहर पोलिसांनी आसिफ याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.त्याच्याकडून चोरीतले तीन मोबाईल, असा तीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस निरीक्षक अभिजीत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली असून अधिक तपास झाकीर काझी करत (Sangli Crime) आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.