Prateik Patal: प्रतीक पाटील यांची राजकारणात एंट्री; साखर कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवड..

author img

By

Published : Feb 11, 2023, 1:57 PM IST

Prateek Patil, son of Jayant Patil

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सुपुत्र प्रतीक पाटील यांची राजकारणात एंट्री झाली आहे. राजराम बापु साखर कारखान्याच्या संचालक पदी प्रतीक पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. राजारामबापू सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सध्या सुरू आहे. या निवडणुकीमध्ये संचालक पदाच्या निवडणुकीत प्रतीक पाटील आता विजय झाले आहेत.

सांगली: राजारामबापू पाटील यांनी देखील आपला राजकीय प्रवास साखर कारखाण्याचा माध्यमातून सुरू केला होता. त्यानंतर जयंत पाटील यांचा राजकीय प्रवेश देखील साखर कारखान्याच्या संचालकाच्या स्वरूपात झाला होता. आता त्यांच पाठोपाठ प्रतीक पाटल यांचा देखील संचालक म्हणून राजकारणात सक्रिय प्रवेश झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. तसेच प्रतीक पाटील यांची कारखान्याच्या अध्यक्षपदी देखील निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


राजकारणाचा केंद्र बिंदु: प्रतीक पाटील यांची कारखान्याच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाली आहे. राजरामबापु, त्यांच्या पाठोपाठ जयंत पाटील आणि आता प्रतीक पाटील यांनी ही आपल्या राजकारणाची सुरुवात साखर कारखान्याचे माध्यमातून केली आहे. वाळवा तालुक्यासह सांगली जिल्ह्यात राजरामबापु साखर कारखानाचे सह युनिट आहेत. जयंत पाटील यांच्या राजकारणाचा साखर कारखाना केंद्र बिंदु राहिला आहे.



राजकारणाची सुरुवात: 1984 मध्ये राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर परदेशातील शिक्षण सोडून जयंत पाटील हे इस्लामपूरला परतले होते. त्यानंतर राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाची जबाबदारी त्यांच्यावर पडली होती. जयंत पाटील सक्रिय राजकारणाची सुरुवात संचालक पदाच्या माध्यमातून सुरू झाली. सहकारी आणि यशस्वीरित्या साखर कारखाना 35 वर्षांपासून जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. कारखान्याचे काही काळ जयंत पाटील अध्यक्ष देखील राहिले. त्यानंतर संचालक म्हणून कार्यरत आहे. तर राजरामबापू कारखान्याचे आता जवळपास चार युनिट झाले आहेत.



बिनविरोध निवड झाली: पाच वर्षा नंतर पार पडलेल्या, राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये यंदा जयंत पाटील यांनी संचालक मंडळाच्या बाहेर राहणे पसंत केले आहे. संचालक पदाच्या 19 जागांसाठी पार पडलेल्या, या निवडणुकीमध्ये संचालक पदासाठी जयंत पाटलांनी मुलगा प्रतीक पाटील यांना उभे केले होते. या निवडणुकीत संचालक मंडळासह प्रतीक पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.



राजकारणातला प्रवास : लवकरच या कारखान्याच्या अध्यक्षपदाची निवडणुकी देखील पार पडणार आहे. प्रतीक पाटील हे साखर कारखान्याचे आगामी अध्यक्ष असतील,अशी शक्यता देखील आता वर्तवली जात आहे. पण गेल्या काही वर्षांपासून प्रतिक पाटील समाजकारणात सक्रिय आहेत. राष्ट्रवादी पक्षाचे सक्रिय सदस्य देखील आहेत. मात्र प्रतीक पाटील यांचा राजकारणातला प्रत्यक्ष प्रवास आता साखर कारखान्याच्या संचालक पदाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे.

हेही वाचा: Bawankule On Sharad Pawar पहाटेच्या शपथविधी मागे शरद पवारांचेच कारस्थान चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.