Sangli Fish Death Case : कृष्णा नदीतील मासे मृत्यूप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्वप्नपूर्ती डिस्टलरीवर बंदीची कारवाई

author img

By

Published : Mar 13, 2023, 6:58 PM IST

Fish Death Case Sangli

सांगलीतील अंकली येथील कृष्णा नदीतील मासे मृत्यूप्रकरणी वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याच्या स्वप्नपूर्ती डिस्टलरी प्रकल्पावर बंदी घालण्यात आली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून याबाबतचा आदेश जारी करण्यात आले आहेत. त्याचबरोबर स्वप्नपूर्ती बिसलरीचा वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा खंडित करण्याबाबतचे आदेश हे संबंधित विभागांना प्रदूषण मंडळाकडून देण्यात आले आहेत.

कृष्णा नदीत हजारो मासे मृत्यूमुखी पडल्याची घटना समोर आली

सांगली : गेल्या काही दिवसांपासून सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आले आहे. महापालिका क्षेत्रातील लाखो लिटर सांडपाणी थेट नदी पात्रात मिसळत असल्याने नदी प्रदूषित होऊन मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. तर शुक्रवारी 10 मार्च रोजी अंकली नजीक कृष्णा नदीत हजारो मासे मृत्यूमुखी पडल्याची घटना समोर आली. याप्रकरणी वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याच्या स्वप्नपूर्ती डिस्टलरी प्रकल्पावर बंदी घालण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण : सांगलीतील अंकली येथे कृष्णाकाठी मृत माश्यांचा खच पडला होता. त्याचबरोबर हजारो मासे हे काठावर येऊन तडफडत होते आणि हे मासे घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी नागरिकांची मोठे झुंबड उडाली होती. मिळेल त्या पिशवीत आणि पोत्यामध्ये भरून मृत मासे नागरिक या ठिकाणाहून घेऊन जात होते. 20 किलो वजनापर्यंत असणारे मासे देखील याठिकाणी मासे मृत्यू पडले होते.


कारखान्याला दिला होता आदेश : सदर मासे मृत्यूप्रकरणी प्रदूषण महामंडळाकडून तातडीने दखल घेत पाणी प्रदूषणाचे नेमके कारण शोधण्यात आले. ज्यामध्ये दत्त इंडिया संचलित वसंतदादा साखर कारखान्याच्या केमिकल युक्त पाणी पाईप फुटल्याने कृष्णा नदीत मिसळल्याचा समोर आल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तातडीने दत्त इंडिया संचलित वसंतदादा साखर कारखान्याला नोटीस बजावण्यात आली. यामध्ये साखर कारखाना का, बंद करू नये ?असा सवाल उपस्थित केला होता. याबाबत साखर कारखान्याला आपले मत मांडण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत.

स्वप्नपूर्ती डिस्टलरीवर बंदीची कारवाई : दत्त इंडिया संचलित वसंतदादा साखर कारखान्याच्या स्वप्नपूर्ती डिस्टलरीचे रासायनिक पाणी शेरीनाल्याद्वारे कृष्णा नदीत मिसळल्याने हा प्रकार घडल्याचे समोर आले. त्यामुळे प्रदूषण मंडळांकडून डिस्टलरी प्रकल्पावर पुढील आदेश येईपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. तसेच वीज वितरण कंपनीला सदर प्रकल्पाची वीज तोडण्याचे आदेश करण्यात आले आहेत. तसेच पाटबंधारे प्रशासनाला सदर प्रकल्पासाठी लागणारया पाणीचा पुरवठा खंडित करण्याचे आदेश देखील जारी करण्यात आले आहेत.

महापालिकेला देखील नोटिस : सांगली महापालिकेकडून देखील मोठ्या प्रमाणात सांडपाणी कृष्णा सोडण्यात येत असल्याने सांगली महापालिकेला देखील प्रदूषण महामंडळाकडून नोटीस बजावण्यात आलेली आहे. फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याबाबतची ही नोटीस प्रदूषण मंडळाकडून बजावण्यात आली होती.

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन : सदरच्या मृत माशामुळे नदी आणखी मोठ्या प्रमाणात प्रदुषित होऊन याचा फटका जयसिंगपूर शहरासह मिरज, अंकली व शिरोळ तालुक्यांतील वीसहून अधिक गावांना बसणार असल्याचा आरोप करत संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकत्यांनी सांगली महापालिका आयुक्त सुनील पावर यांच्या निवासस्थानी मृत मासे फेकले होते. रात्रीच्या सुमारास स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी जवळपास 5 पोती भरुन मृत मासे हे सांगली शहरातील आयुक्तांच्या बंगल्यासमोर त्याच बरोबर सांगली महापालिका कार्यलयाच्या समोर देखील फेकून निषेध नोंदवला होता.

हेही वाचा : Death of Madhu Markandeya : अभिनेत्री भाग्यश्रीच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.