खून करून अपघाताचा बनाव उघडकीस, वहिनीच्या खून प्रकरणी दिराला अटक

author img

By

Published : Sep 26, 2021, 2:56 AM IST

अनैतिक संबंधाच्या संशयातून दिराने वहिनीचा खून केल्याचा प्रकार भिलवडी पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणी पलूस पोलीस ठाण्यात कुणाल पवार (वय 28 वर्षे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला पलूस येथील न्यायालयात हजर केले असता न्यायाधिशांना कुणालला 29 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.

सांगली - खून करून अपघाती मृत्यूचा बनाव केल्याचा प्रकार पलूस तालुक्यातील बुर्ली येथे समोर आला आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातून दिराने वहिनीचा खून केल्याचा प्रकार भिलवडी पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणी कुणाल पवार (वय 28 वर्षे) याला अटक करत त्याच्या विरोधात पलूस पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

खून करून अपघाताचा बनाव उघडकीस, वहिनीच्या खून प्रकरणी दिराला अटक

जिन्यावरुन पडून मृत्यू झाल्याचा बनाव

पलूस तालुक्यातील बुर्ली येथील सायली केतन पवार (वय 22 वर्षे) या विवाहित तरुणीचे शेजारच्या युवकाशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून दिर कुणाल पवार (वय 28 वर्षे) याने गुरुवारी (23 सप्टेंबर) हत्या केल्याचा छडा पलूस पोलिसांनी लावला आहे. खून केल्यानंतर विवाहितेचा जिन्यावरून पडून मृत्यू झाल्या बनाव करण्यात आला होता.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सायली केतन पवार ही विवाहित तरुणीचे तिच्या घराशेजारीच असणाऱ्या श्रेयस पवार या तरुणाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय सायलीचा दिर कुणाल पवार याला होता. खुनाचा घटनेच्या आदल्या दिवशी श्रेयस हा सायली याला भेटायला घरी येऊन गेल्याची माहितीही कुणाला पवार याला मिळाली होती. या रागातून कुणाल पवारने 23 सप्टेंबरला घरात सायली पवार ही आपल्या खोलीत एकटी असताना तिच्या गळ्यावर, उजव्या व डाव्या हाताच्या मनगटावर धारदार हत्याराने वार करून खून केला. त्यानंतर कुणालने सायली ही जिन्यावरून पडल्याचा बनाव करत मध्यरात्रीच्या सुमारास तिला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात अपघात झाल्याचे भासवून दाखल केले होते. मात्र, तत्पूर्वी तिचा मृत्यू झाल्याचा रुग्णालयाकडून घोषित करण्यात आले होते. तर याच घटनेने दरम्यान श्रेयस पवार या तरुणानेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला होता.

अनैतिक संबंधाच्या संशयातून खून

या प्रकरणी पलूस पोलिसांनी खुनाचा संशय आल्याने पोलिसांनी सखोल चौकशी आणि तपास केला असता, कुणाल पवारने आपली भावजय सायली पवार हिचा खून केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पलूस पोलीस ठाण्यात कुणाल पवारच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून कुणालाला अटक करण्यात आली. त्याला पलूस न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 29 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पलूस पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली आहे.

हेही वाचा - कोरोना, महापुराच्या दुहेरी संकटाबरोबर सांगलीकरांवर आता वीज तोडणीचा आसूड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.