Onion Weighting 800 Grams : 'या' कांद्याचा नादच खुळा; दर नव्हे तर वजन पाहून शेतकरीही घालतात तोंडात बोट

author img

By

Published : Feb 28, 2023, 9:24 PM IST

Onion Weighting 800 Grams In Sangli

कांद्याचा दराचा प्रश्न सध्या पेटला आहे. कांद्याचे गडगडलेले दर हा विषय संपूर्ण राज्यभर गाजू लागला आहे. पण हाच कांदा सांगलीत सध्या दरामुळे नव्हे तर त्याच्या वजनामुळे चर्चेत आला आहे. या कांद्याचे वजन ऐकून आश्चर्यचकित होत आहेत. कारण एका कांद्याचे वजन तब्बल साडेसातशे ते आठशे ग्रॅम इतके आहे. त्यामुळे आपसूकच हा कांदा पाहून सगळेच अवाक् होत आहेत.

वजनी कांदा दाखविताना शेतकरी

सांगली: बाजारामध्ये कांद्याचे दर गडगडले आहेत. 15 रुपये पासून 25 रुपये किलो पर्यंत कांद्या बाजारात मिळतात. हाच कांदा शेतकरी विकायला गेल्यावर त्याच्या हातात दोन रुपये आल्याची घटना समोर आली आहे. सोलापूर इथल्या एका शेतकऱ्याला आपला 500 किलो कांदा विकल्यानंतर चक्क दोन रुपयांची पट्टी हातात आली होती. व्यापाऱ्यांनी मग चक्क दोन रुपयाचा चेक देखील राजेंद्र चव्हाण या शेतकऱ्याला दिला. हजारो रुपये खर्च करून अगदी कवडीमोल दराने कांदा विकला असला तरी या शेतकऱ्यांच्या हाताला दोन पैसे मिळाले असते. मात्र कांदा फुकटच विकण्या ची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.


'त्या' व्यापाऱ्याचा परवाना रद्द: राज्यामध्ये अशाच प्रकारची कांदा उत्पादकांची परिस्थिती समोर येऊ लागली आहे. यावरून चांगलेच रान देखील पेटले आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याचा दराचा प्रश्न अगदी राजकारणात कळीचा मुद्दा बनला आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही कांद्याच्या दरावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप देखील सुरू केले आहेत. तर दोन रुपयांचा चेक देणाऱ्या सोलापूरच्या त्या व्यापाऱ्याचा परवाना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द देखील केला आहे. यामुळे राज्यात सध्या कांद्याच्या दराचा प्रश्न चांगला पेटलेला जाणवतो.


एकच कांदा 800 ग्रॅम वजनाचा: एका बाजूला ही परिस्थिती असताना दुसऱ्या बाजूला सांगलीत मात्र एका कांद्याची चर्चा जोरदार सुरू आहे. पलूस तालुक्यातल्या ब्रम्हनाळ येथील शेतकऱ्याच्या शेतात उगवलेला कांदा सगळ्या जिल्ह्यामध्ये नव्हे तर शेतकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. कारण या कांद्याच्या दरामुळे नव्हे तर वजनामुळे सगळेच डोक्याला हात लावत आहे. ब्रम्हनाळ मधील शेतकरी हनुमंत शिरगावे यांच्या शेतामध्ये एका ओल्या कांद्याचे वजन सरासरी 750 ते 800 ग्रॅम एवढे भरत आहे.


शेतकरीही कांदा पाहून हैराण: शेतकरी हनुमंत शिरगावे यांनी ऊसाची लागण असलेल्या शेतामध्ये आंतरपीक म्हणून कांद्याची लागवड केली होती. ऊसाची भरणी करण्याचे काम सुरू आहे. अशातच शेतकऱ्यांनी कांदा काढण्यास सुरुवात केली. शेतामधून प्रारंभी जास्त वजनाचे दहा-बारा मोठे कांदे निघाले. त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र सर्वच कांदा एकसारखाच दिसू लागला. त्यामुळे त्यांनी त्याचे वजन केले असता चक्क साडेसातशे ते आठशे ग्रॅमपर्यंत वजन भरू लागले. याबाबत शिरगावे म्हणाले, स्थानिक बाजारपेठेतूनच कांद्याचे तरु (रोपे) आणले होते. ऊसाच्या लागणीमध्ये आंतरपीक म्हणून ते केले होते. आंतरपीक असल्यामुळे सुरुवातीला ऊसासोबतच 12:61:00 अळवणी, दोन वेळा आणि ह्युमिक व फुलविक आम्ल तसेच सिव्हिडची फवारणी दोन वेळा घेतली होती. ऊसासाठी केलेला प्रयोग हा कांद्यासाठी सुद्धा यशस्वी लागू झाला, असे मत शिरगावे व्यक्त करत आहेत.

हेही वाचा: Madarsa Student Beaten In Thane: पाठांतर व्यवस्थित नाही म्हणून मदरशात अल्पवयीन विद्यार्थाला जबर मारहाण; व्हिडिओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.