आता लढा राज्य बस कर्मचाऱ्यांसाठी- पडळकर

author img

By

Published : Sep 20, 2021, 9:26 AM IST

आमदार गोपीचंद पडळकर

जे राज्य कर्मचाऱ्यांना, तेच एसटी कामगारांना द्या अन्यथा संघर्ष अटळ आहे, असा इशारा देत (21 सप्टेंबर)रोजी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठकीचे आयोजन आमदार गोपिचंद पडळकर यांनी केले आहे. तसेच, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधताना एसटी महामंडळातील सचिन वाझे कोण आहेत? असा प्रश्नही पडळकर यांनी यावेळी उपस्थित केला आहे. ते सांगलित पत्रकारांशी बोलत होते.

सांगली - भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आता एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी लढा उभारणार आहेत. जे राज्य कर्मचाऱ्यांना, तेच एसटी कामगारांना द्या अन्यथा संघर्ष अटळ आहे, असा इशारा देत (21 सप्टेंबर)रोजी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठकीचे आयोजन पडळकर यांनी केले आहे. तसेच, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधताना एसटी महामंडळातील सचिन वाझे कोण आहेत? असा प्रश्नही पडळकर यांनी यावेळी उपस्थित केला आहे. ते सांगलीच्या झरे येथे बोलत होते.

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर
कर्मचाऱ्यांवर आत्महत्येची वेळ का?

मोठ्या विश्वासाने महाराष्ट्रातला प्रवासी आजही एसटीने प्रवास करतो. पण, आपल्या त्यागाने व सेवेने एसटी महामंडळला मोठे करणाऱ्या मराठी
कर्मचाऱ्यांवरच आत्महत्येची वेळ यावी, ही राग आणि अपमान वाटणारी बाब आहे. एकतर तुटपुंजा पगार त्याचाही वेळेवर पत्ता नाही. ठाकरे सरकार सत्तेत येऊन दोन वर्ष उलटत आले. परंतु, कर्मचाऱ्यांचे वेतन करार अजून झाले नाहीत. महामंडळाला आवश्यकता नसणाऱ्या गोष्ठीसाठी हजारो कोटींचे टेंडर काढ़ून खाजगी कंत्राटदारांची संपूर्ण देणी दिली जाते. मात्र, कर्मचाऱ्यांचे मुलभूत पगार दिले जात नाहीत.

जे राज्य कर्मचाऱ्यांना, तेच एसटी कामगारांना

हे सर्व कुणाच्या टक्केवारीसाठी चाललंय? परिवहन मंत्र्यांचा महामंडळातला सचिन वाजे कोण? या सर्व विरोधात ज्या युनियनने आवाज उठवायला पाहिजे, तेच आज प्रस्थापितांच्या तालावर नाचत आहेत. पण माझ सर्व एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन आहे, की आपण कुठल्याही दबावाला न झुकता आपल्या हक्कासाठी लढा उभारा. मी तुमच्या पाठीशी खंबरीपणे उभा आहे. माझे राज्य सरकारडे मागणे आहे, की जे राज्य कर्मचाऱ्यांना तेच एसटी कामगारांना द्या. अन्यथा, संघर्ष अटळ असून या लढ्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी येत्या (21 सप्टेंबरला) आटपाडी तालुक्यातील झरे येथे या लढ्याची दिशा ठरवण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. आपण तिथे जास्त संख्येने यावे. असे, आवाहन आमदार पडळकर यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.