Sanjay Raut on ECI : खासदार संजय राऊत यांची निवडणूक आयोगावर बोलताना जीभ घसरली; म्हणाले, शिवसेना त्यांच्या...

author img

By

Published : Mar 3, 2023, 10:33 PM IST

Updated : Mar 4, 2023, 6:24 AM IST

Sanjay Raut Tongue Slipped

खासदार संजय राऊत यांची निवडणूक आयोगावर बोलताना जीभ घसरली आहे. यावेळी त्यांनी थेट निवडणूक आयोगाला उद्देशून आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला आहे. विधीमंडळाला चोरमंडळ म्हटल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. सत्तधाऱ्यांनी अधिवेशनात त्यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाईची मागणी केली होती. यातच आता पुन्हा संजय राऊत यांनी निवडणुक आयोगाबद्दल अवार्च भाषेचा वापर केला आहे.

संजय राऊत यांची निवडणूक आयोगावर बोलताना जीभ घसरली

सातारा : चाळीस चोर ज्या पद्धतीने शिवसेनेशी बेईमानी करून पळून गेले. त्यांनी पैशाच्या जोरावर शिवसेना आणि धनुष्य बाण विकत घेण्याचा प्रयत्न केला. त्या चोरांविषयी मी चोर मंडळ म्हटले होते. त्यांनी शिवसेना पक्ष नव्हे तर शिवसेना विधीमंडळ पक्ष फोडला आहे. अशा चोर मंडळामुळेच विधीमंडळाची प्रतिष्ठा खालावली असल्याचा हल्लाबोल खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर केला. ते कराडमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.

बेईमानी करणाऱ्यांना चोरमंडळ म्हटले : सांगली दौरा संपवून सातारला जाताना त्यांनी कराडमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला. हक्कभंगाच्या नोटीसीबद्दल विचारले असता मी कुणाचा हक्कभंग केलाय, असा प्रतिप्रश्न करून खासदार राऊत म्हणाले, विधीमंडळाला चोरमंडळ म्हणण्याएवढा मी असभ्य माणूस आहे का? मी एका वृत्तपत्राचा संपादक आहे. २० वर्षांपेक्षा जास्त काळ मी संसदेत आहे. कोणते शब्द कोठे वापरायचे ते माहिती आहे. मराठी भाषा मला त्यांच्यापेक्षा जास्त समजते. जे चाळीस चोर शिवसेनेशी बेईमानी करून पळून गेले. त्या चोरांच्या विषयी मी बोललो.

पैशाच्या जोरावर विधीमंडळ पक्ष फोडला : खासदार राऊत म्हणाले, पळून गेलेल्या चोरांनी विधीमंडळ पक्ष फोडला, पक्ष नाही. त्यांनी पैशाच्या जोरावर शिवसेना आणि धनुष्य बाण विकत घेण्याचा प्रयत्न केला. अशा चोरमंडळामुळेच विधीमंडळाची प्रतिष्ठा खालावली, असे माझे म्हणणे असल्याचा खुलासा त्यांनी केला.

माझ्या शब्दाचा अर्थ समजून घ्या : सांगलीत बोलताना निवडणूक आयोगावर शिवराळ वक्तव्य केल्याबद्दल विचारले असता खासदार राऊत म्हणाले, मग काय म्हणायचं? त्यांनी खालच्या पातळीवर निर्णय दिलेले चालतात का? मराठीत त्याला शिवी म्हणत नाहीत. मी वापरलेल्या शब्दाचा डिक्शनरीत काय अर्थ आहे तो समजून घ्या. मराठी भाषेत शिव्या आपण प्रेमाने वापरतो.

निवडणूक आयोगाची लफंगेगिरी : शिवराळ भाषा आणि शब्दांमुळे संस्कृतीला तडा जात नाही का, या प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले की, निवडणूक आयोगाने बाळासाहेबांची शिवसेना लफंगेगिरी करून चोरांच्या हातात ठेवली. हे लोकशाही आणि भारतीय संस्कृतीला धरून आहे का? याचा आपण सगळ्यांनी जरा विचार केला पाहिजे.

कुणावर हल्ला झालाय? : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ला तुमच्या आणि आदित्य ठाकरेंच्या सांगण्यावरून झाल्याचा संशय व्यक्त अमेय खोपकरांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात बोलताना खासदार राऊत यांनी कोणावर हल्ला झालाय? संदीप देशपांडे कोण? मला समजले नाही. कोण आहेत हे ग्रहस्थ? असे उपरोधिक सवाल त्यांनी केले. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था एवढी बिघडलेली आहे की रोज पाच-पंचवीस लोकांवर हल्ले होताहेत. रोज शंभरेक लोकांना धमक्या दिल्या जाताहेत. हे ग्रहस्थ कोण, ते मला माहिती नाही, असेही राऊत म्हणाले.

नीतेश राणेचा मेंदू टिल्ला : आमदार नीतेश राणे करत असलेल्या टीकेबद्दल बोलताना खासदार राऊत म्हणाले, त्यांना टीका करू द्या. त्यांचा मेंदू टिल्ला. त्याचं सगळंच टिल्लं असल्याचा खोचक टोला त्यांनी खासदार राऊत यांनी नीतेश राणेंना लगावला.

सांगली : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा शिवसैनिकांचा मेळावा आज सांगली मध्ये पार आहे. या मेळाव्यामध्ये संजय राऊत यांनी @केंद्रीय परिषद घेऊन टीका केली आहे. ही टीका करताना राऊत यांनी मारल्या शिव्या देखील आहेत. @ज्यांना आणि शिवसैनिकांनी निवडून दिले ते आजच आहेत. ते 50 खोकेल पळून गेले आणि चाचणी आयोग सांगतोय शिवसेना त्यांची, शिवसेना बापाची आहे का ? भो****च्या . शिवसेना ही काय आयोगाने निर्माण केली आहे ? असा सवाल करत बाळासाहेब महिला शिवसेना आहे. 50-55 बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना सरकार केली आहे, असे स्पष्ट केले आहे.

चाळीस चोर अशी शिंदे गट आमदारांची अवस्था : खासदार संजय राऊत यांनी आपल्या भाषणाला सुरवात केल्यानंतर उपस्थित शिवसैनिकांनी निम का पत्ता कडवा है,एकनाथ शिंदे भडवा है अशा घोषणा दिल्या. मुख्यमंत्री विषय असे बोलेन योग्य नाही, मुख्यमंत्र्यांचा सन्मान राखला पाहिजे, पण जर जनतेच्या भावना असतील तर, मी काही बोलणार नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. संजय राऊत म्हणाले, मेरा बाप चोर है, चाळीस चोर अशी शिंदे गट आमदारांची अवस्था आहे. त्यांच्यावर असणारा गद्दारीचा शिक्का पुसणे आता शक्य नाही. ज्यांनी शिवसेने सोडले त्यांना सगळया भारतीय जनता पक्ष मातीत गाडल्या शिवाय राहणार नाही. निवडणूक आयोगाने शिवसेना, शिंदे यांच्या घशात घातली. त्यानंतर राज्यात वणवा पेटला आहे. आज देशात सुरू असलेली गुंडशाही, हुकूमशाही मोडायची असेल तर, शिवसेनेला आता रस्त्यावर उतरावे लागेल,असे आवाहन खासदार संजय राऊत यांनी शिवसैनिकांना केले आहे.

मशाल घेऊन पेटावयल वेळ लागणार नाही :आज आपल्याकडे पक्ष आणि चिन्ह नाही, पण आज हजारोच्या संख्येने कार्यकर्ते आहेत. त्यामुळे चोर गेले, जनता आमच्या बरोबर आहे. आपण पुन्हा पुन्हा सांगलीत येईन, पण फडणवीस यांच्या प्रमाणे नाही, आता सांगली महापालिकेत भगवा फडकवा लागणार असल्याचे ते म्हणाले. धनुष्यबाण चिन्ह गेले म्हणून आम्ही दुःख करत नाही. आता एका हातात मशाल घेऊन उभे आहोत, पेटावयल वेळ लागणार नाही. निवडणूक हरणार असेल तरस, भारत पाकिस्तान सुरू होत. पण हिमती असेल तर भारत चीन सुरू करू, भारताची जागा चीनने घेतली त्यावर बोला. काश्मीरमध्ये हिंदू पंडित्यांच्या हत्या होतात. त्यावर मोदी-शहा काही बोलत नाहीत,असे ही राऊत म्हणाले.





महाराष्ट्र शिव्या घालतो : मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत संजय राऊत यांना निवडणूक आयोगाबाबत वापरण्यात आलेल्या शिवराळ भाषेबाबत विचारला असता त्यांनी त्या शब्दांवर ठाम भूमिका घेत, मग होऊ दे ना ट्रोल, महाराष्ट्र शिव्या घालतो असे स्पष्टीकरण दिले आहे. खासदार राऊत म्हणाले, जे कसब्यात झालं,ते 2024 मध्ये सांगली आणि मिरजेमध्ये होईल. खरी शिवसेना कोणाची त्यासाठी निवडणूक घ्या जनताच ठरवेल. इतका दिवस कसब्यात शिवसेनेच्या मदतीने भाजप विजय होत होता. ज्यांना तुम्ही पक्ष, चिन्ह दिले त्या पक्षाची मते कसब्याच्या निवडणुकीमध्ये का ? पडली नाहीत. याचा त्यांनी विचार करावा. तसेच यापुढे चंद्रकांत पाटील कोथरूडमधून निवडणूक लढणार आहेत का? कारण आता पुण्याची हवा बदलली आहे. चंद्रकांतदादा आता टोपी सांभाळा, असा टोला संजय राऊत यांनी चंद्रकांत दादा पाटील यांना लगावला आहे.

हेही वाचा - आशिष शेलार आरोप: 'या' कारण लता मंगेशकर विद्यापीठाची परवानगी नाकारली; आशिष शेलार उद्धव राहुल गांधी

Last Updated :Mar 4, 2023, 6:24 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.