सत्ता गेल्यानंतर काहींना भ्रमिष्टपणा येतो तर काहींचा तोल जातो, जयंत पाटलांचा चद्रकांत पाटलांना टोला

author img

By

Published : Oct 19, 2021, 8:51 AM IST

Updated : Oct 19, 2021, 8:58 AM IST

मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे जयंत पाटील यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

सत्ता गेल्यानंतर काही लोकांना भ्रमिष्टपणा येतो, काही लोकांचा तोल जातो, आता चंद्रकांत दादांचे यापैकी काय झाले आहे, याचे संशोधन करावे लागेल असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. चंद्रकांत पाटलांनी नुकतीच जयंत पाटील यांचे नाव न घेता करेक्ट कार्यक्रम करणाराला मोठा शॉक द्या अशी टीका केली होती. त्यावर बोलताना जयंत पाटील यांनी वरील टीप्पणी केली आहे. सांगलीमध्ये महापालिकेच्या वतीने आयोजित मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे जयंत पाटील यांच्या उपस्थितीत भूमिपूजन झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

सांगली - सत्ता गेल्यानंतर काही लोकांना भ्रमिष्टपणा येतो, काही लोकांचा तोल जातो, आता चंद्रकांत दादांचे यापैकी काय झाले आहे, याचे संशोधन करावे लागेल असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. चंद्रकांत पाटलांनी नुकतीच जयंत पाटील यांचे नाव न घेता करेक्ट कार्यक्रम करणाराला मोठा शॉक द्या अशी टीका केली होती. त्यावर बोलताना जयंत पाटील यांनी वरील टीप्पणी केली आहे. दरम्यान, एकेरी भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीत कधीच नव्हती, ती दुर्दैवाने चंद्रकांत पाटलांनी वापरली. मला वाटतं चंद्रकांत पाटलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतही खाजगीत एकेरी भाषा वापरली असावी, असही पाटील म्हणाले आहेत. सांगलीमध्ये महापालिकेच्या वतीने आयोजित मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे जयंत पाटील यांच्या उपस्थितीत भूमिपूजन झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

41 बेडचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल

सांगली महापालिकेच्यावतीने कुपवाड वारणाली या ठिकाणी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत कम्युनिटी हेल्थ सेंटर इमारत उभारण्यात येत आहे. याचा भूमिपूजन सोहळा सोमवारी पार पडला. जयंत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाला. याप्रसंगी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार अरुण लाड, सांगली महापालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त नितीन कापडणीस, काँगेस प्रदेशउपाध्यक्ष विशाल पाटील यांच्यासह नगरसेवक व पालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते. 5 कोटी रुपये खर्च करून 41 बेडचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल याठिकाणी पालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे.

आता हॉस्पिटल नागरिकांची गरज

या उद्घाटन प्रसंगी बोलताना मंत्री पाटील म्हणाले, कोरोना काळात हॉस्पिटल किती गरजेचे आहेत हे आता लोकांना चांगलं कळले आहे. त्यामुळे आता नागरिक रस्ते, गटारी यापेक्षा हॉस्पिटलला अधिक महत्त्व देत आहेत. लोकांची हॉस्पिटलची मागणी आता वाढली आहे. त्यामुळे महापालिकेच्या या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमुळे गोरगरीब नागरिकांना फायदा होईल. त्याचबरोबर सांगली महापालिका क्षेत्रातल्या विविध विकास कामांना गती देण्यासाठी आणि या मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या निर्मितीसाठी राज्य सरकार या माध्यमातून आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही यावेळी जयंत पाटील यांनी दिली.

हेही वाचा - विमान इंधनापेक्षा पेट्रोल-डिझेल महाग; सामनातून पुन्हा केंद्र सरकारवर निशाणा

Last Updated :Oct 19, 2021, 8:58 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.