Sangli Crime : मैत्रीला काळिमा ! किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून, तिघांना अटक

author img

By

Published : Mar 6, 2023, 1:11 PM IST

Sangli Crime

किरकोळ कारणातून झालेल्या भांडणाच्या रागात मित्रांनेच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना सांगलीच्या वाळवा तालुक्यातील बावची परिसरात घडली. ओंकार रकटे असे, खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी आष्टा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

सांगली : सांगलीच्या वाळवा तालुक्यातल्या बावची येथील ओंकार रकटे, वय वर्ष 23 या तरुणाची हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे ओंकार याच्या मित्रानेच हा खून केल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी आष्टा पोलिसांनी सम्मेद सावळवाडे, भरत काटकर आणि राकेश हालुंडे अशा तिघा मित्रांना अटक केली आहे.


तिघांना अटक : दिनांक 27 फेब्रुवारीपासून तो गायब होता. त्याचा मित्र सुरज सरगर याने आष्टा पोलीस ठाण्यात त्याबाबतची माहिती दिली होती. यानंतर आष्टा पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी सम्मेद सावळवाडे, ओंकार रकटे यांची चौकशी केली. त्यानंतर पोलिसांनी सम्मेद सावळवाडे ( वय 26 ), भरत काटकर ( वय 36 ), राकेश हालुंडे ( वय 23 ) सर्व रहाणार आष्टा, या तिघांनाही ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली. सुरुवातीला तिघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र सखोल चौकशी केली असता सत्य समोर आले.


किरकोळ कारणावरून भांडण : काही दिवसांपूर्वी सम्मेद सावळवाडे आणि ओंकार रकटे यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. या भांडणाचा राग सम्मेद याच्या मनात निर्माण झाला होता. यातून सम्मेदने हा प्रकार केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ओंकार याचा खून करणारे सम्मेद सावळवाडे, भरत काटकर आणि राकेश हालुंडे हे तिघेही संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्या विरोधात आष्टा पोलीस ठाण्यामध्ये वेगवेगळे गुन्हे देखील दाखल आहेत. पोलिसांकडून घटनेचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

गाडी घासल्याने वृद्धाचा खून : कवठेमहांकाळ तालुक्यातल्या बोरगाव-शिरढोण रोडवरील हद्दीमध्ये गाडी घासल्याच्या वादातून तिघांनी मिळून एका वृद्धाचा निर्घृण खून केला होता. त्यानंतर घडलेल्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि कवठेमहांकाळ पोलिसांनी दोन तासातच छडा लावला. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहेत. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश देखील आहे. ही घटना 5 मार्चला घडली.

हेही वाचा : Sangli Crime News: रिक्षाला गाडी घासल्याने वृद्धाचा खून करणाऱ्या तिघांना 2 तासात अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.