डिश टीव्ही कंपनीला न्यायालयाचा दणका, ग्राहकाला  आजीवन मोफत चॅनल दाखवण्याचे आदेश

author img

By

Published : Sep 18, 2022, 7:53 PM IST

Updated : Sep 18, 2022, 8:29 PM IST

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायालय

एका डिश टीव्ही कंपनीस सांगली न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. एका ग्राहकाला अजीवन मोफत चॅनल दाखवण्याचे आदेश ग्राहक न्यायालयाने दिले आहेत आहेत. डिश टीव्ही कंपनीकडून फ्री चैनलची जाहिरात करून ग्राहकाची फसवणूक केल्या प्रकरणी ग्राहक न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

सांगली - एका डिश टीव्ही कंपनीस सांगली न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. एका ग्राहकाला अजीवन मोफत चॅनल दाखवण्याचे आदेश ग्राहक न्यायालयाने दिले आहेत आहेत. डिश टीव्ही कंपनीकडून फ्री चैनलची जाहिरात करून ग्राहकाची फसवणूक केल्या प्रकरणी ग्राहक न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

सांगलीतील ग्राहक विजय भूपाल जैन यांनी डिश टीव्ही इंडिया कंपनीचे सेट टॉप बॉक्स खरेदी केले. त्यावेळी 43 चॅनल्स आजीवन मोफत मिळतील, अशी जाहिरात व पत्रक ग्राहकास देण्यात आले. त्यानंतर सन (2019)मध्ये सेट टॉप बॉक्स अचानक बंद पडलेने ग्राहकाने कंपनीकडे विचारना केली असता, महिना रिचार्ज केले शिवाय फ्री चॅनल्स दिसणार नाहीत, असे कंपनीकडून सांगण्यात आले. यानंतर जैन यांनी सांगली येथील ग्राहक न्यायालयात धाव घेत ॲडव्होकेट धन्यकुमार धावते व ॲडव्होकेट वैभव मुकुंद केळकर यांच्यामार्फत न्यायालयात तक्रार दाखल केली होती.

सदरचा तक्रारीबाबत ग्राहक न्यायालयाने दाखल घेऊन डिश टीव्ही कंपनीला अर्जदार ग्राहक विजय जैन यांना जाहिरातीत नमूद केले. प्रमाणे 43 चॅनल आजीवन मोफत उपलब्ध करून देण्याबाबत आदेश पारित केला आहे. तसेच, कंपनीने यापुढे अशा फसव्या जाहिराती देऊ नये. तसेच, ग्राहक जैन यांना झालेल्या त्रासापोटी व अर्जाचा खर्च रु 3000/- मात्र देणे बाबत ग्राहक न्यायालयाचे मुकुंद दात्ये अध्यक्ष, श्रीमती निलंबरी देशमुख व अश्रफ नायकवडी यांच्यातर्फे पारित करण्यात आले आहे.

Last Updated :Sep 18, 2022, 8:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.