पूरग्रस्तांना घेऊन भाजपने पलूस तहसील कार्यालयावर काढला धडक मोर्चा

author img

By

Published : Sep 14, 2021, 5:25 PM IST

Updated : Sep 14, 2021, 8:22 PM IST

palus bjp

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भाजपच्यावतीने पलूस तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. पलूस तालुक्यातील अनेक गावांचे महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

सांगली - पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भाजपच्यावतीने पलूस तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. महाविकास आघाडी सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली, मात्र ती केवळ घोषणाच ठरली आहे. अद्यापही पलूस तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. त्याचबरोबर अनेक प्रश्नही निर्माण झाले आहेत. पण राज्य सरकार हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजपने सरकार विरोधात मोर्चा काढण्यात आला.

पलूसमध्ये भाजपचा मोर्चा

हेही वाचा - पवई तलावात गणेश विसर्जनादरम्यान मगरीचे दर्शन

  • सरकारकडून केवळ घोषणाबाजी -

पलूस तालुक्यातील अनेक गावांचे महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पूर येऊन दीड महिना उलटून देखील शासनाने पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान, विस्थापित भत्ता, घर पडझडीचे अनुदान, घरभाडे, छोट्या मोठ्या व्यापारी-व्यावसायिकांना मदत, शेतकऱ्यांना कर्जमाफी व कसल्याही प्रकारची नुकसान भरपाई दिलेली नाही. तसेच वीज बिल वसुलीसाठी शेतकरी, सामान्य वीज ग्राहकांची वीज कनेक्शन तोडण्यात येत आहेत, असा आरोप सांगली जिल्हा भाजपच्यावतीने करण्यात आला आहे.

  • निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा -

या सर्व मुद्द्यांवर महाविकास आघाडी सरकारला जाग आणण्यासाठी भाजप पलूस तालुक्याच्यावतीने भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संग्राम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पलूस तहसील कार्यालयावर पूरग्रस्तांचा धडक मोर्चा काढण्यात आला. देवेंद्र फडणवीस सरकारने 2019 च्या महापुरात ज्या पद्धतीने मदत दिली, त्याच निकषाप्रमाणे किंवा त्यापेक्षा जास्त मदत पूरग्रस्तांसाठी केली पाहिजे. तसेच ही मदत तातडीने द्यावी, अशी मागणी यावेळी भाजपने केली. तसेच महाविकास आघाडी सरकारने याबाबतीत दुर्लक्ष केल्यास पुढील काळात पूरग्रस्तांना घेऊन तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा भाजपच्यावतीने जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी दिला आहे.

हेही वाचा - वर्धा नदीत बोट उलटून एकाच कुटुंबातील ११ जण बुडाले; तिघांचे मृतदेह सापडले

Last Updated :Sep 14, 2021, 8:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.