bhakri making initiative या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी शिकतात भाकरी बनवायला, दिले जातात स्वालंबनाचे धडे

author img

By

Published : Sep 11, 2022, 7:09 PM IST

Zilla Parishad School

Zilla Parishad School जत तालुक्यातल्या कुल्लाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये Zilla Parishad School at Kullalwadi चक्क भाकरी बनवण्याच्या आणि तेही मुलांच्या स्पर्धा पार पडल्या आहेत. पुस्तकी ज्ञानाबरोबर मुलांना स्वयंपाकाचे कौशल्य देखील मिळावा. या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या कुल्लाळवाडी शाळेने 'भाकरी' Mazi Bhakari initiative बनवण्याच्या अनोख्या स्पर्धांचे आयोजन केलं होते.

सांगली जत तालुक्यातल्या कुल्लाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये Zilla Parishad School at Kullalwadi चक्क भाकरी बनवण्याच्या आणि तेही मुलांच्या स्पर्धा पार पडल्या आहेत. पुस्तकी ज्ञानाबरोबर मुलांना स्वयंपाकाचे कौशल्यदेखील मिळावा. या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या कुल्लाळवाडी शाळेने 'भाकरी' Mazi Bhakari initiative बनवण्याच्या अनोख्या स्पर्धांचे आयोजन केलं होते. Zilla Parishad School at Kullalwad ज्यामध्ये सुमारे 80 हुन अधिक मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. गेल्या 8 वर्षांपासून 'माझी भाकरी' उपक्रमाअंतर्गत भाकरी बनवण्याच्या स्पर्धा पार पडतात.

'माझी भाकरी' उपक्रम जत हा दुष्काळी तालुका आणि या तालुक्यातील कुलाळवाडी हे गाव या गावातील जवळपास 90% कुटुंब ऊसतोड मजूर आहेत. वर्षातले सहा महिने आपल्या संसारासाठी आई- वडील व इतर नातेवाईक ऊसतोड करण्यासाठी परगावी जातात. त्यानंतर त्यांच्या मुलांना गावातच राहावं लागत. या परिस्थितीमध्ये लहान मुलांचे जेवणाचा मोठा प्रश्न निर्माण होत असतो. नेमकी हीच बाब ओळखून कुल्लाळवाडी येथील जिल्हा परिषदेतील शिक्षक भक्तराज गर्जे सरांनी मुलांच्या पोटाचा प्रश्न आणि त्यांना स्वयंपाकाच्या बाबतीत स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने 'माझी भाकरी' उपक्रम सुरू केला. यातून गेल्या सात वर्षांमध्ये शाळेतील अनेक मुलांना भाकरी बनवण्यासाठी प्रोत्साहन दिल. ज्यामुळे अनेक मुलं आता उत्तम प्रकारच्या भाकऱ्या स्वतः बनवतात.

शाळेत शिकवले जातेय 'भाकरी' बनवायला

80 हुन अधिक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग इतकच नव्हे तर इतर स्वयंपाक देखील आता या मुलांना येऊ लागला आहे. दरवर्षी माझी भाकरी उपक्रमांतर्गत भाकरी बनवण्याच्या स्पर्धा मुलांसाठी आयोजित करण्यात येतात. यंदाही ही भाकरी बनवण्याची स्पर्धा शाळेमध्ये पार पडली. यामध्ये शाळेतील इयत्ता तिसरीपासून आठवीपर्यंतच्या सुमारे 80 हुन अधिक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. अनेक विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्तम प्रकारच्या अगदी मुलींच्या आणि महिलांच्या प्रमाणे भाकऱ्या थापून बनवल्या होत्या. ज्यामध्ये उत्तम प्रकारची भाकरी बनवणाऱ्या विद्यार्थ्याला बक्षिसे दिले जातात.

महत्त्व पटवून द्यायचा प्रयत्न कुल्लाळवाडी जिल्हा परिषद मराठी मुला- मुलींची शाळा मुलांना पुस्तकी शिक्षणाबरोबर भौतिक शिक्षण देण्याचे काम करते. सध्या शाळेमध्ये जवळपास 250 च्या आसपास पटसंख्या आहे. ज्यामध्ये 100 मुलं आणि दीडशेच्या आसपास मुलींची संख्या आहे. मात्र 2016 पर्यंत शाळेची पटसंख्या ही खूपच कमी होते. या कारणांचा शोध घेत असताना शाळेतील शिक्षक भक्तराज गरजे यांना गावातले ऊसतोड मजूर परगावी जाताना मुलांना देखील घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर गरजे सर यांनी पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यायचा प्रयत्न केला असता. ऊसतोड मजूर कुटुंबांनी मुलांच्या जेवणाचे होणारे हाल लक्षात आणून दिले. त्यानंतर यावर मार्ग काढण्यासाठी मुलांनाच स्वयंपाकामध्ये नैपुण्य मिळवून देण्यासाठी 'माझी भाकरी' हा उपक्रम हाती घेतला.

शाळेच्या इतर शिक्षकांनाही माझी उपक्रमाबाबत पटवून दिलं. त्यासाठी मग माझी भाकरी उपक्रम अंतर्गत भाकरी बनवण्याच्या स्पर्धा आयोजन करण्याचा ठरलं. 2016 मध्ये पहिल्यांदा शाळेत भाकरी बनवण्याच्या स्पर्धा पार पडल्या आहेत. ज्याला जेम- तेम मुलांनी सहभाग घेतला होता. सुरुवातीला शाळेतल्या मुलांना भाकरी कसं बनवायचं,आपण बकरी बनवू शकतो का ? ते तर मुलींचे काम आहे, असा प्रश्न पडला होता. मात्र शिक्षकांनी मुलांना प्रोत्साहन देत भाकरी बनवण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना सुचवल्या.

विद्यार्थी आता उच्च शिक्षणासाठी परगावी सुरुवातीला घरात आई- वडील भाकरी बनवण्यासाठी त्यांना पीठ देण्यासाठी नकार द्याचे, मग त्यातून गरजे सरांनी मुलांना त्यांच्या घरी असणाऱ्या शेणापासून गौरया थापण्याचा मार्ग सांगितला. यातून भाकरी बनवणं त्यांना सोप्प जाणार होतं. आणि झालेही तसेच अनेक मुलांनी घरामध्ये गौरया थापण्याचं प्रयोग केला. त्यानंतर पार पडलेल्या अनेक स्पर्धांमध्ये शाळेतील प्रत्येक मुलगा भाकरी बनवण्याच्या स्पर्धेत सहभागी होऊ लागला, तर गावातले अनेक विद्यार्थी आता उच्च शिक्षणासाठी परगावी आहेत. त्या ठिकाणी त्यांना जेवणाचा भेडसवणारा प्रश्न शाळेतल्या 'माझी भाकरी' उपक्रमा अंतर्गत सुटला आहे. कारण ती मुलं स्वतः स्वयंपाक करतात, असे कुल्लाळवाडी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक भक्तराज गर्जे सांगत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.