मिरज दंगल प्रकरणात सरकारकडून खटला मागे; 106 जणांची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

author img

By

Published : Sep 30, 2021, 4:33 PM IST

Updated : Sep 30, 2021, 4:48 PM IST

जिल्हा सत्र न्यायालय

मिरज दंगलीचे पडसाद त्यावेळच्या विधानसभा निवडणूकीत उमटले होते. आघाडी सरकारकडून या दंगलीचे खटले बरखास्त करण्याबाबत न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयाने हा खटला निकाली काढत 106 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. दंगली प्रकरणी भाजपा प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री चंद्रकांत पाटील, मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांच्यावरदेखील गुन्हे दाखल झाले होते

सांगली - मिरज शहरामध्ये 2009 दरम्यान झालेल्या जातीय दंगली प्रकरणी महत्त्वाची बातमी आहे. या प्रकरणातील 106 जणांची सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. गणेश उत्सवाच्या दरम्यान ही जातीय दंगल घडली होती.

मिरज दंगलीचे पडसाद त्यावेळच्या विधानसभा निवडणूकीत उमटले होते. आघाडी सरकारकडून या दंगलीचे खटले बरखास्त करण्याबाबत न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयाने हा खटला निकाली काढत 106 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.

106 जणांची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

हेही वाचा-राज्यपाल भाजपचा अजेंडा चालवतात, नवाब मलिक यांची टीका

मिरज दंगलीतील 106 जणांची निर्दोष मुक्तता-

मिरज शहरा मध्ये 2009 साली गणेशोत्सवा दरम्यान शिवसेनेकडून मिरज शहरा मध्ये अफजलखान वधाच्या फलक उभारण्यात आला होता. त्यावर लिहिण्यात आलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर मिरज शहरामध्ये जातीय दंगल भडकली होती. दहा ते पंधरा दिवस मिरज शहर या दंगलीत धगधगत होते. या दंगलीचे पडसाद सांगली जिल्ह्यासह शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यातही उमटले होते. मिरज-सांगली शहरांमध्ये पंधरा दिवस कडक संचारबंदी लागू होती. या दंगली प्रकरणी सांगली महापालिकेचे तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे महापौर मैनुद्दीन बागवान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, मिरज शिवसेनेचे शहरप्रमुख विकास सूर्यवंशी यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या 106 जणांहून अधिक जणांव गुन्हे दाखल करण्यात आले होते.

हेही वाचा-अनिल देशमुख आणि परमबीर सिंह कुठे आहेत हे राज्य सरकारला माहिती नाही; अजित पवारांचा खुलासा

आघाडी सरकारकडून खटले काढून घेण्यासाठी अर्ज-

सांगली जिल्हा सत्र न्यायालयामध्ये या दंगलीचा खटला सुरू होत,दरम्यान दोन महिन्यांपूर्वी महाविकास आघाडी सरकारकडून हा खटला बरखास्त करण्याबाबत न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यानुसार जिल्हा सत्र न्यायालयाने खटला बरखास्त करून या दंगली प्रकरणी 106 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे, अशी माहिती बचाव पक्षाच्या वकील बिलकीस बुजरूक यांनी दिली आहे.

हेही वाचा-देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत अमित शाहांची घेतली भेट; गोवा विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा

भाजपा नेत्यांची आधीच मुक्तता-
दंगली प्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री चंद्रकांत पाटील, मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांच्यावरदेखील गुन्हे दाखल झाले होते. मात्र, 2017 मध्ये तत्कालीन युती सरकारकडून हे गुन्हे मागे घेत चंद्रकांत पाटील, सुरेश खाडे, भाजपचे सरचिटणीस मकरंद देशपांडे यांची निर्दोष मुक्तता केली होती.

निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादीचा सुफडासाफ

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिरज दंगलीचे पडसाद उमटले होते. सर्वाधिक परिणाम सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात झाला होता. दंगलीनंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मिरज दंगलीचे पडसाद सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात उमटले होते.ज्यामध्ये जातीय ध्रुवीकरण निर्माण होऊन अनेक प्रस्थापित काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. जवळपास काँग्रेस-राष्ट्रवादीचे 5 ते 6 विद्यमान आमदारांचा पराभव झाला होता. या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा सुपडा साफ करत शिवसेना आणि भाजपने आपला पाया दंगलीच्या पार्श्वभूमीवर मजबूत झाला होता.

Last Updated :Sep 30, 2021, 4:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.