केंद्राच्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत सायकल रॅली

author img

By

Published : Oct 31, 2021, 4:45 PM IST

सायकल रॅली

पर्यावरणमंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार रविवारी (दि. 31) केंद्र शासनाच्या निषेधार्थ राज्यव्यापी आंदोलनाचा एक भाग म्हणून रत्नागिरीत रॅली काढण्यात आली. यामध्ये सहभागी झालेल्या उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सायकल सवारी करत केंद्राच्या इंधन दरवाढीचा निषेध नोंदवला.

रत्नागिरी - पर्यावरण मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार रविवारी (दि. 31) केंद्र शासनाच्या निषेधार्थ राज्यव्यापी आंदोलनाचा एक भाग म्हणून रत्नागिरीत रॅली काढण्यात आली. यामध्ये सहभागी झालेल्या उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सायकल सवारी करत केंद्राच्या इंधन दरवाढीचा निषेध नोंदवला.

बोलताना मंत्री सामंत

केंद्र सरकारचा करण्यात आला निषेध

यावेळी मंत्री सामंत म्हणाले, शंभर कोटी जनतेला कोरोना लस दिल्यामुळे देशभरात कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र, पेट्रोल, डिझेलचे भाव शंभर रुपयांच्या वर गेले आहेत. त्याचे नक्की काय करायचे. ते भाव कमी कसे करता येणार. त्याचे परिणाम सामान्यांना सहन करावे लागत आहेत. हे दाखवून देण्यासाठी रत्नागिरीत केंद्र शासनाच्या निषेधार्थ रत्नागिरीत सायकल रॅलीचे काढण्यात आली आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले.

पेट्रोल, डिझेल शंभर पार, हेच का अच्छे दिन मोदी सरकार..?

मारुती मंदिर येथून ही सायकल रॅली जयस्तंभावर काढण्यात आली. पेट्रोल, डिझेल शंभर पार, हेच का अच्छे दिन मोदी सरकार..?, असे फलक या रॅलीमध्ये लावण्यात आले होते. वाढत्या इंधन दराविरोधात निषेधही नोंदवला जात होता. इंधनाच्या वाढत्या दरामुळे त्रस्त नागरिकांना बैलगाडीने प्रवास करावा लागेल, असा संदेश रॅलीमध्ये बैलगाडी ठेवण्यात आली होती.

हे ही वाचा - चंद्रकांतदादा हल्ली झोपेतही बोलतात, त्यांचं बोलणं जास्त मनावर घेऊ नका - जयंत पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.