मुंबई-पुणे एक्सप्रेसवे'वर भिषण अपघात, तिघांचा जागीचा मृत्यू

author img

By

Published : Oct 18, 2021, 9:00 AM IST

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे'वर भिषण अपघात

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे'वर आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास खंडाळा घाटातील किमी 39 येथे सहा वाहनांचा भिषण अपघात झाला. यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, मदत यंत्रणांनी अथक परिश्रम करत सदरच्या वाहनांमध्ये आडकलेले मृतदेह व जखमींना बाहेर काढले आहे. तसेच, अपघातग्रस्त वाहने बाजुला करत खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली आहे.

रायगड (खलापूर) - मुंबई-पुणे एक्सप्रेसवे'वर आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास खंडाळा घाटातील किमी 39 येथे सहा वाहनांचा भिषण अपघात झाला. यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, मदत यंत्रणांनी अथक परिश्रम करत सदरच्या वाहनांमध्ये आडकलेले मृतदेह व जखमींना बाहेर काढले आहे. तसेच, अपघातग्रस्त वाहने बाजुला करत खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली आहे.

माहिती देताना देताना मदत ग्रुप प्रमुख

कारचा पुर्णपणे चुरा झाला

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या एका टेम्पो चालकांचे नियंत्रण सुटल्याने तो समोरील भाजीच्या टेम्पोवर आदळला. यामध्ये दोन टोम्पोच्या मध्ये एक कार चिरडली आहे. यामध्ये कारचा पुर्णपणे चुरा झाला आहे. यामध्ये एका हुंदाई कारमधील चालक व अन्य एकजण असे दोन तर कोंबडी वाहक टेम्पोचा चालक असे एकूण 3 जण या अपघातात मृत्यू झाले आहेत. दरम्यान, सहा जणांना वाचवण्यात यश आले आहे.

मदत यंत्रणा सरसावल्या

यावेळी बोरघाट पोलीस, खोपोली वाहतूक पोलीस, आयआरबी, डेल्टा, मृत्युंजय देवदूत यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीला संस्थेचे कार्यकर्ते, लोकमान्यची टिम ऐवढ्या यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत मयत व जखमी यांना बाहेर काढले. तसेच, वाहतूक सुरळीत केली.

हेही वाचा - नातवाने केली आजीची हत्या, नाशिक जिल्ह्यातील घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.