रायगड : प्रतिक मोहिते याची कमी 'उंचीचा बॉडीबिल्डर' म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

author img

By

Published : Sep 26, 2021, 11:51 AM IST

raigad latest news

डोलवली या ग्रामीण भागातील प्रतीक विठ्ठल मोहिते याने कमी उंचीचा बॉडीबिल्डर म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. या तरुणाने अपंगत्त्वावर मात करत हे यश मिळवले आहे.

रायगड - खालापूर तालुक्यातील डोलवली या ग्रामीण भागातील प्रतीक विठ्ठल मोहिते याने कमी उंचीचा बॉडीबिल्डर म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. या तरुणाने अपंगत्त्वावर मात करत हे यश मिळवले आहे. कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांच्याहस्ते प्रतिकचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, 16 सप्टेंबर रोजी ऑनलाइन पद्धतीने जगातील सर्वात कमी उंचीच्या बॉडी बिल्डर स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत प्रतीकने सहभाग घेतला होता.

प्रतिक्रिया

गरिबी व अपंगावर मात करत गाठले शिखर -

गरिबी व अपंगावर मात करत प्रतीकने आपले उच्च शिक्षण पूर्ण केले. त्याला बॉडीबिल्डींगची आवड असल्याने त्याने 2012 पासून व्यायाम शाळेत जात सराव सुरू केला होता. त्यानंतर त्याने विविध स्पर्धेत भाग घेत अनेक स्पर्धा जिंकल्या. याबदरम्यान, गरिबी परिस्थिती आणि अपंगत्त्वामुळे त्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. मात्र, अनेकांनी त्याला आर्थिक मदत आणि टीप्स देत मदत केली. त्याने 2020 ला रायगड श्री किताब मिळवला. तर 2021 ला मिस्टर इंडिया स्पर्धेतही त्याने भाग घेतला होता.

आमदार महेंद्र थोरवेंनी केला सत्कार -

दरम्यान, 16 सप्टेंबर रोजी जगातील सर्वात कमी उंचीचा बॉडी बिल्डर म्हणून प्रतीक मोहिते यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याने खालापूर तालुक्याच्या नावे मानाचा तुरा रोवला गेला. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असताना कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनीही सत्कार करत त्याला पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा - 'टास्क फोर्स'च्या सूचनांनुसार मुंबईत शाळा सूरु करण्याचा निर्णय घेऊ -महापौर किशोरी पेडणेकर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.