Heavy rains in Pen: पेणमध्ये मुसळधार पाऊस.परिस्थिती नियंत्रणात असल्याची स्थानिक प्रशासनाची माहीती

author img

By

Published : Jul 6, 2022, 7:35 PM IST

मुसळधार पाऊस

पेणमध्ये मुसळधार पाऊस (Heavy rains in Pen). बाळगंगा नदी किनारील, खरोशी गावच्या 49 लोकांचे जिल्हा परिषद शाळेत स्थलांतर. सर्व परिस्थिती नियंत्रणात असल्याची स्थानिक प्रशासनाची (Local administration informed) माहीती.

पेण-रायगड : गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy rains in Pen) पडत असून या पावसाचा जोर आजही कायम आहे. या पावसामुळे आतापर्यंत पेण तालुक्यातील पाच घरे आणि एका बेड्याचे नुकसान झाले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र तालुक्यातील इतर सर्व परिस्थिती नियंत्रणात असून, नागरिकांना प्रशासनाकडून विविध प्रकारच्या वेळोवेळी सूचना देण्यात येत आहेत. तर बाळगंगा नदीकिनारील खरोशी गावातील 12 कुटुंबांचे म्हणजेच एकूण 49 नागरिकांचे जिल्हा परिषदेच्या शाळेत स्थलांतर करण्यात आले आहे.


तालुक्यातील उंबर्डे येथील दोन, वाशी येथील दोन आणि इंद्रनगर येथील एक असे एकूण पाच घरे आणि रोडे येथील एका बेड्याचे नुकसान झाले आहे. पेण तालुक्यातील प्रशासन या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज झाले आहे. त्यामध्ये महसूल कार्यालयातील तलाठी, मंडळ अधिकारी, पोलिस पाटील, ग्राम सेवक, कोतवाल, पोलिस प्रशासन, पालिका प्रशासन, आदी प्रकारचे विभाग कार्यरत आहेत. आज दिवसभरात पेण तालुक्यातील धरणे, नद्या, नाले यांची पातळी नियंत्रणात असून प्रशासनाने निगडे, खरोशी, कोलेटी या ठिकाणी पाण्याची पातळी नियंत्रणात असल्याची तपासणी केली. तसेच ठिकठिकाणी जाऊन नागरिकांशी संवाद साधून, पुरस्थितीबाबत ग्रामस्थांना सूचना देखील देण्यात आल्या. काल रात्री पेण शहराला लागून असणाऱ्या आंबेघर गावाजवळ पेण - खोपोली मार्गावरील एक झाड उन्मळून पडल्याने मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. शहरात देखील बाजारपेठ, कोळीवाडा आदी ठिकाणी रस्त्यांवर पाणी भरले होते. आज दिवसभरात पेण तालुक्यातील 139.00 मिमी पावसाची नोंद झाली असून, यावर्षी आजपर्यंत 572.00 मिमी पाऊस पेणमध्ये पडला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.


पेण तालुक्यात जोरदार पाऊस पडत असून पुढील दोन दिवस आणखी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. तेव्हा नागरिकांनी आपापली काळजी घ्यावी. घरातील वयोरुद्ध, आजारी व्यक्तींसाठी आवश्यक औषधे घेऊन ठेवावी, पिण्याचे पाणी, टॉर्च, मेणबत्ती, माचिस, ड्राय फूड यांचा पुरेसा साठा करावा, पाणी गाळून व उकळून प्यावे त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचा धोका वाटत असेल तर आपल्या गावातील सरपंच, पोलिस पाटील यांना संपर्क करावा, किंवा सूचना करण्यासाठी तहसिल कार्यालय पेण दूरध्वनी क्रमांक 02143 - 252036 व 8459482937 येथे संपर्क साधावा. अश्या सुचना स्थानिक प्रशासनाकडुन देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा :Heavy Rain : मुंबईत मुसळधार, कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्टसह हाय टाईडचा इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.