पेणमध्ये ढोलकीतून घुमू लागलंय गणेशोत्सवाचा नाद

author img

By

Published : Sep 6, 2021, 10:40 PM IST

Ganeshotsav

गणेशोत्सव चार दिवसांवर आला आहे. ढोलकी विक्रेते शहरामध्ये गल्लोगल्ली जाऊन ढोलकी विक्रीचा व्यवसाय करत आहेत. पेणमध्ये डेरेदाखल झालेले ढोलकी विक्रेते उत्तरप्रदेशहून व्यवसाय करत आहेत. साधारणपणे छोट्या ढोलक्यांपासून मोठ्या ढोलक्यांपर्यंत 100 रुपयांपासून ते 300 - 700 रुपयांपर्यंत या ढोलक्या विकल्या जात आहेत.

पेण - रायगड हिंदूंचे सण खऱ्या अर्थाने श्रावण महिन्यात सुरू होतात. श्रावण महिन्यात विविध प्रकारच्या सणांसह खऱ्या अर्थाने लगबग सुरू होते ती गणेशोत्सवाची. गणेशोत्सवाची तयारी काही ठिकाणी आधीच केली जाते. त्यामुळे व्यावसायिक देखील गणेशभक्तांना लागणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तू बाजारात विक्रीसाठी ठेऊन सज्ज झाले आहेत. त्यातीलच गणेशोत्सवासाठी लागणारी ढोलकी ही एक महत्वाची बाब आहे. गणेशोत्सव मधील ढोलकीची मागणी लक्षात घेता पेण शहरात उत्तरप्रदेश मधील ढोलकी विक्रेते विक्री साठी दाखल झाले आहेत.

पेणमध्ये ढोलकीतून घुमू लागलंय गणेशोत्सवाचा नाद

पेण शहर हे गणेश मूर्तींसाठी प्रसिद्ध आहे. त्यातील 70 टक्के व्यावसायिकांचे गणपती कारखाने आहेत. त्यामुळे बाप्पाची पूजा अर्चा करताना ज्याप्रमाणे टाळ महत्वाचे असतात, त्याप्रमाणे आरती म्हणताना लागणारी ढोलकी आता पेणच्या बाजारपेठेत विराजमान झाली आहे.

100 ते 300 रुपयापर्यंत ढोलकी
गणेशोत्सव चार दिवसांवर आला आहे. ढोलकी विक्रेते शहरामध्ये गल्लोगल्ली जाऊन ढोलकी विक्रीचा व्यवसाय करत आहेत. पेणमध्ये डेरेदाखल झालेले ढोलकी विक्रेते उत्तरप्रदेशहून व्यवसाय करत आहेत. साधारणपणे छोट्या ढोलक्यांपासून मोठ्या ढोलक्यांपर्यंत 100 रुपयांपासून ते 300 - 700 रुपयांपर्यंत या ढोलक्या विकल्या जात आहेत.

ढोलकी आवश्यक
गणेशोत्सव मध्ये आरती व भजनासाठी ढोलकी ही अत्यावश्यक आहे. उत्तरप्रदेश येथुन आलेल्या या विक्रेत्यां कडील ढोलकी ही कमी प्रतीची असली तरी दोन ते तीन वर्षे ही ढोलकी टिकते. किंमत कमी असल्याने ही ढोलकी खरेदी करणे परवडते.
सुनिल पाटील, ग्राहक,देवनगरी-पेण

विक्रीत होईल वाढ
गणेशोत्सवासाठी दरवर्षी पेण शहरात एक महिना आधीच आम्ही येत असतो. गणेशोत्सव सुरू व्हायला अजून चार दिवस असल्याने दिवसाला 8 ते 10 ढोलकीची विक्री होत आहे. जसजसा गणेशोत्सव जवळ येईल तसतशी या विक्रीत वाढ होईल.
दीपक शर्मा, ढोलकी विक्रेता, उत्तरप्रदेश

हेही वाचा - येवल्यात पोळा सणानिमित्त बैलांवर रेखाटले अनोखे संदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.