Boy Drowned in Khadakwasla Dam : खडकवासला धरणात बुडून मुलाचा मृत्यू, दोन दिवसांनी हडपसरमध्ये सापडला मृतदेह

author img

By

Published : Jun 16, 2022, 2:30 PM IST

Boy Drowned in Khadakwasla Dam

पावसाळा सुरू झाला असला तरी पुण्यात उन्हाचा चटका कमी झालेला नाही. त्यामुळे पुण्यातील खडकवासला धरणात दररोज मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. पोलीस बंदोबस्त असला तरी काही पर्यटक हे लपून छपून पाण्यात जातात. अश्यातच मयूर हा सोमवारी खडकवासला धरणाच्या कालव्यात पोहण्यासाठी गेला होता. पाण्याचा प्रवाह जास्त होता आणि मयुरला पोहताही येत नव्हते. त्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला. त्याचा मृतदेह दोन दिवसांनी हडपसच्या कॅनॉलमध्ये सापडला आहे. ( 13 years old Boy Drowned in Khadakwasla Dam )

पुणे - पुण्यातील खडकवासला धरणात बुडून एका 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. दोन दिवसांपूर्वी पोहण्यासाठी गेलेला 13 वर्षीय मुलगा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला ( 13 years old Boy Drowned in Khadakwasla Dam ) होता. त्यानंतर आज दोन दिवसांनी त्याचा मृतदेह हडपसर येथील शिंदे वस्ती परिसरात असलेल्या कॅनॉलमध्ये सापडला आहे. मयुर बापू मरगळे (वय 13) असे पाण्यात बुडालेल्या मुलाचे नाव आहे.

मृतदेह सापडला कॅनॉलमध्ये - पावसाळा सुरू झाला असला तरी पुण्यात उन्हाचा चटका कमी झालेला नाही. त्यामुळे पुण्यातील खडकवासला धरणात दररोज मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. पोलीस बंदोबस्त असला तरी काही पर्यटक हे लपून छपून पाण्यात जातात. अश्यातच मयूर हा सोमवारी खडकवासला धरणाच्या कालव्यात पोहण्यासाठी गेला होता. पाण्याचा प्रवाह जास्त होता व मयुरला पोहता येत नव्हते, त्यामुळे तो बुडाला. स्थानिक पोलीस, अग्निशामक दलाच्या दोन दिवसीय शोध मोहिमेनंतर त्याचा मृतदेह आज हडपसर येथील कॅनॉलमध्ये सापडला आहे.

दोन दिवस शोध घेत होते पथक - मयूर सोमवारी खडकवासला धरणाच्या कालव्यात पोहण्यासाठी उतरला होता. त्याच्यासोबत लहान भाऊ आणि आणखी एक मित्र होता. मयूरला पोहता येत नव्हते तरीही तो पाण्यात उतरला होता. त्यानंतर पाण्याचा वेग जास्त असल्याने मयूर कलव्यातच बुडाला. त्याच्या सोबत असलेल्या भावाने आणि मित्राने मयूरच्या आजोबांना याची माहिती दिली. आजोबांनी पोलीस स्टेशन गाठत पोलिसांना हा सर्व प्रकार सांगितला. या घटनेनंतर दोन दिवस सातत्याने अग्निशमन दल आणि हवेली पोलीस त्याचा शोध घेत होते. आज (गुरुवार) अखेर त्याचा मृतुदेह हडपसर येथील शिंदे वस्ती परिसरात असलेल्या कॅनॉलमध्ये सापडला आहे.

हेही वाचा - Strawberry Moon Photos : स्ट्रॉबेरी सुपरमूनचे जगातील विविध ठिकाणचे आकर्षक फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.