Betting On IPL Cricket Match : क्रिकेट सट्टेबाजीप्रकरणी तिघांना अटक, पाच जणांवर गुन्हा दाखल

author img

By

Published : May 21, 2023, 3:36 PM IST

Betting On IPL Cricket Match

साईबाबा नगर कोंढवा येथील धर्मश्री सिग्नेचर सोसायटीच्या बंद फ्लॅटमध्ये क्रिकेट सामन्यावर सट्टा लावत असल्याची माहिती पोलिसांना मिळली होती. या प्रकरणी आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या बुकींना पुणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी कक्षाने तीघांना अटक केला आहे.

पुणे : सध्या आपल्या देशात आयपीएल मोठ्या प्रमाणात सुरू असून आयपीएलच्या सामन्यांदरम्यान देशभरात अनेक ठिकाणी बेटिंगच्या घटना घडत आहे. आज याप्रकरणी पुणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने पुण्यातही कारवाई केली आहे. कोंढवा येथे सट्टेबाजीप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विविध वेबसाइट्सच्या माध्यमातून बेटिंग सुरू होती. याप्रकरणी वसीम हनिफ शेख रा. कोंढवा, इक्रामा मकसूद मुल्ला रा.ए. घोरपडी पेठ, आणि मुसबीत महमूद बशैब रा सोमवार पेठ यांना अटक करण्यात आली आहे. . पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील एका प्रसिद्ध पबच्या मालकासह मुंबई, मध्य प्रदेश, दुबईतील बुकीजची माहिती समोर आली आहे.

आयपीएल मॅचसाठी क्रिकेट बॅटिंग : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा येथील साईबाबा नगर येथील धनश्री सिग्नेचर सोसायटीमध्ये असलेल्या एका बंद फ्लॅटमध्ये आयपीएल मॅचसाठी क्रिकेट बॅटिंग सुरू असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वसीम हनिफ शेख, इकरामा मकसूद मुल्ला, मुसबीत मेहमूद बशैब हे तिघे मोबाईलवर ऑनलाईन क्रिकेट खेळत असल्याचे आढळून आले. या छाप्यामध्ये ५ मोबाईल, १ लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. तसेच गुन्हा दाखल करण्यात आला. कोंढवा पोलीस स्टेशन क्र. 519/2023 अन्वये 420, 34 आयपीसी, जुगार प्रतिबंधक कायदा 4(अ) 5, भारतीय टेलिग्राफ कायदा 25(क) अंर्तगत पुढील तपास पोलीस करीत आहेत.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, कोंढवा येथील एका सोसायटीत काही बुकी आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी सुधीर इंगळे, शंकर संपते यांना मिळाली. मिळालेल्या माहितीची पडताळणी करण्यात आली. पोलिस आयुक्त रितेशकुमार, सहायक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलिस गुन्हे शाखेचे आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर, खंडणीविरोधी पथक-१ चे वरिष्ठ उपायुक्त अजय वाघमारे यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा :

  1. IIT Mumbai Student Suicide : आयआयटीतील विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, भाजपचा आरोप
  2. Bombay High Court: न्यायालयाचा परीक्षा आणि निकालाच्या नियोजन वेळापत्रकाबाबत हस्तक्षेप नसेल- मुंबई उच्च न्यायालय
  3. IAS Officer Molestation : महिला IAS अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी IRS अधिकाऱ्याला अटक
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.