Student Suicide : एका मित्राकडून उसने पैसे घेऊन दुसऱ्याला दिले, दुसऱ्याने दिला दगा, 'त्याची' आत्महत्या

author img

By

Published : May 12, 2023, 5:36 PM IST

Updated : May 12, 2023, 6:18 PM IST

Student Suicide Case Pune

पुणे शहरातील डेक्कन परिसरात मराठवाडा मित्र मंडळ लॉ कॉलेजमध्ये तिसर्‍या वर्षाला शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. राज रावसाहेब गर्जे (22 वर्षे, रा. बीड) असे मृताचे नाव आहे. मित्राला पैसे हवे असल्याने राजने मध्यस्थी केली होती. मात्र, मित्राने पैसे परत न दिल्याने त्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस आणि मृताच्या भावाची प्रतिक्रिया

पुणे: या प्रकरणी पोलिसांनी चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यामध्ये आत्महत्येचा गुन्हा दाखल आहे. ही घटना 9 मे रोजी घडली आहे. राजचे वडील रावसाहेब प्रल्हाद गर्जे यांनी चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. याप्रकरणी निरूपम जयवंत जोशी याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


'या' कारणाने केली आत्महत्या: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज रावसाहेब गर्जे हा पुण्यातील डेक्कन परिसरातील मराठवाडा मित्र मंडळ लॉ कॉलेजमध्ये तिसर्‍या वर्षाला शिक्षण घेत होता. राज आणि आरोपी निरूपम हे दोघेही तीन वर्षांपासूनचे मित्र होते. आरोपी निरूपमने राज याच्या मध्यस्थीने 50 हजार रुपये घेतले होते. राजने सतत मागणी करूनही आरोपी निरुपम हा पैसे देत नव्हता. पैशासाठी समोरून राजला विचारणा केली जात होती. यामुळे त्याने तणावातून हॉस्टेलमध्येच चिठ्ठी लिहून आत्महत्या केली.

भाऊ म्हणतो पैशासाठी आत्महत्या अशक्य: राज गर्जे याला निरुपमने अज्ञात कारणावरून त्याला त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. यामुळे त्याने वसतिगृहाच्या रूममध्ये 09 मे रोजी आत्महत्या केली. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे, असे यावेळी चतुःश्रुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी सांगितले. यावेळी मयत राज याचा भाऊ म्हणाला की, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि पैश्यासाठी आमचा भाऊ हा आत्महत्या करू शकत नाही. तुर्तास पोलीस या घटनेच्या सर्व बाजूंचे निरीक्षण करीत आहे.

सिनिअरच्या छळाला कंटाळून आत्महत्या: तेलंगणामध्ये वरिष्ठांच्या छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मेडिकलच्या विद्यार्थ्यीनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. फेब्रुवारी, 2023 रोजी घडलेल्या या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तर दुसरीकडे तेलंगणातील वारंगलमध्ये एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थीनीने देखील आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

विद्यार्थिनीचा मृत्यू: या महिन्याच्या 22 तारखेला वारंगळ एमजीएम येथील ज्येष्ठ विद्यार्थिनीच्या छळामुळे दुखावलेल्या प्रीतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, ही घटना घडली असताना सहकारी विद्यार्थ्यांनी तिला पाहिले होते. यानंतर विद्यार्थ्यांनी ताबडतोब तिला एमजीएममध्ये उपचारासाठी दाखल केले. उपचार दरम्यान त्या विद्यार्थीची प्रकृती चिंताजनक होती. त्यानंतर संध्याकाळी त्या विद्यार्थ्यांनीला हैदराबाद येथील निम्समध्ये दाखल करण्यात आले. 22 फेब्रुवारीपासून उपचार घेत असलेल्या या वैद्यकीय विद्यार्थ्याचा रविवारी मृत्यू झाला.

हेही वाचा:

  1. Sanjay Raut On Shinde Govt : सर्वोच्च न्यायालयाने 'त्यांना' नागडे केले; शिंदे सरकारवर संजय राऊत यांचा घणाघात
  2. Ravi Rana on Uddhav Thackeray : 'उद्धव ठाकरेंच्या अहंकाराचा झाला चुराडा'
  3. Param Bir Singh : शिंदे-फडणवीस सरकार परमबीर सिंहांवर मेहेरबान; निलंबनासह आरोप घेतले मागे
Last Updated :May 12, 2023, 6:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.