Firing in Pune: पिंपरी चिंचवड शहरात भरदिवसा गोळ्या झाडून हत्या, आरोपी पसार

author img

By

Published : May 22, 2023, 10:46 PM IST

Firing in Pune

पुणे येथील पिंपरी- चिंचवड शहरात भर दिवसा गोळ्या झाडून एकाची हत्या करण्यात आली आहे. ही घटना सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडल्याची माहिती चिखली पोलिसांनी दिली आहे. सोन्या तापकीर असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पिस्तुलातून गोळ्या झाडल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पुणे: पुण्यात दिवसाढवळ्या भरदिवसा गुन्हे घडत आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धकच उरलेला दिसत नाही. पिंपरी- चिंचवड शहरातील सोन्या तापकीर हा चिखली चौकात थांबला होता. तेव्हा, दुचाकीवरून आलेल्या दोघांनी सोन्या तापकीर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. यात गंभीर जखमी होऊन सोन्या तापकीरचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अनोळखी हल्लेखोर पसार झाले आहेत. या घटनेमुळे पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.

सोन्या तापकीर आणि अज्ञात हल्लेखोराचे वाद: आरोपीचा शोध पिंपरी चिंचवड पोलीस घेत आहेत. काही दिवसांपूर्वी सोन्या तापकीर आणि अज्ञात हल्लेखोराचे वाद झाले होते, अशी प्राथमिक माहिती पोलिसानी दिली आहे. १२ मे रोजी भर दिवसा किशोर आवारे यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झालेला आहे का? असे नागरिक विचारत आहेत.

तरुणाकडून हवेत गोळीबार : याआधीही अशीच घटना घडली होती. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढत असून, एकीकडे शहरात कोयता गँगकडून दहशत पसरवीली जात आहे. गेल्या महिनाभरापासून पुण्यातील अनेक भागांमध्ये नागरिकांवर कोयत्याने हल्ले झाल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. मांजरी, सिंहगड रोड, हडपसर, नाना पेठ, स्वारगेटसह अनेक भागांमध्ये आरोपींनी कोयत्याने गाड्या फोडत नागरिकांवर वार केल्याच्या अनेक घटना यापूर्वी समोर आलेल्या आहेत. तर, दुसरीकडे शहरात गोळीबार झाल्याच्या घटना घडली होती. पुण्यातील येरवडा येथे शेकोटी पेटवण्यावरून तरुणाकडून हवेत गोळीबार झाल्याची घटना घडली होती. याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर अशा घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

हेही वाचा -

  1. Pune Crime News पुण्यात आता चपलांचीही चोरी चोरट्यांनी गोडाऊनमधून चोरल्या 40 हजारांच्या चपला
  2. Pune Crime News पुण्यात वेश्याव्यवसायाचे वाढते सत्र पिंपरीचिंचवडमध्ये स्पाच्या नावाखाली चालत होता वेश्याव्यवसाय दलालास पोलिसांनी ठोकल्या बेड्या
  3. Prostitution Exposed बारामती शहरातील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.