ETV Bharat / state

Trekker Died: धक्कादायक...पुण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या ट्रेकरचा तोल जाऊन मृत्यू

पुण्यातल्या प्लस व्हॅली येथे कुंडात पोहण्यासाठी उतरलेल्या ट्रेकरचा पाण्यात बुडून मृत्यू (Trekker Died)झाल्याची घटना समोर आली आहे. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांना मृतदेह बाहेर काढण्यास यश मिळाले आहे.

Trekker Died
धक्कादायक...पुण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या ट्रेकरचा तोल जाऊन मृत्यू

Published : November 21, 2022 at 10:45 PM IST

Choose ETV Bharat

पुणे: पुण्यातल्या प्लस व्हॅली येथे कुंडात पोहण्यासाठी उतरलेल्या ट्रेकरचा पाण्यात बुडून मृत्यू (Trekker Died)झाल्याची घटना समोर आली आहे. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांना मृतदेह बाहेर काढण्यास यश मिळाले आहे. पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर ही व्हॅली असून या घटनेने मित्रांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अजित मोतीलाल कश्यप वय 23, रा. खराडी असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

अशी घडली घटना- अजित कश्यप, अभिजित रोहिला, आलोक रावत, प्रभाकर पवार, ओंकार साधले हे मुळशी तालुक्यात असणाऱ्या डोंगरवाडी येथील प्लस व्हॅली (plus valley) येथे ट्रेकिंगसाठी आले होते. पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर असणारी ही व्हॅली प्रसिद्ध आहे. या व्हॅलीत तीन कुंड असून येथे लोक पोहण्यासाठी उतरत असतात. त्यातील एका कुंडात अजितचे दोन मित्र उतरले होते. त्यानंतर अजित पाण्यात उतरत असताना त्याचा तोल गेल्याने त्याचे डोके कुंडामधील दगडावर आदळले. तो अतिशय घाबरलेल्या वस्थेत होता.

तरीही तो पाण्यात हात पाय मारत होता. जवळ पोहत असलेल्या ट्रेकर्सने त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, तोपर्यंत तो पाण्यात बुडाला होता. तीन ते साडेतीन तासांच्या प्रयत्नानंतर रेसक्यू टीमला अजितला बाहेर काढण्यात यश मिळाले.