Pune Crime News : रेल्वे स्टेशनवरून पिस्तुल ६ काडतुसांसह आरोपीला अटक श्याम मानव यांना मिळालेल्या धमकीचे कनेक्शन
Updated on: Jan 26, 2023, 9:04 AM IST

Pune Crime News : रेल्वे स्टेशनवरून पिस्तुल ६ काडतुसांसह आरोपीला अटक श्याम मानव यांना मिळालेल्या धमकीचे कनेक्शन
Updated on: Jan 26, 2023, 9:04 AM IST
पुणे पोलिसांनी एक मोठी कारवाई करत घातपाताचा कट उधळून लावला आहे. पुणे रेल्वे स्टेशन येथे संशयास्पद जाणार्या एका प्रवाशाला लोहमार्ग पोलिसांनी पकडले आहे. त्याच्याकडून परदेशी बनावटीचे पिस्तुल, ६ काडतुसे याच्यासह साडेतीन लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
पुणे : याबाबतची माहिती अशी की, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर लोहमार्ग पोलीस पुणे रेल्वे स्टेशनवर बंदोबस्त करीत असताना एक जण घाईघाईत प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरुन संशयास्पदरित्या जात असल्याचे पोलिसांना दिसले. त्याच्याकडून साडेतीन लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अनिलकुमार रामयग्य उपाध्याय (वय ४७, रा. सुरत, गुजरात) असे त्याचे नाव आहे. त्याने पिस्तूल कोणत्या कारणासाठी बाळगले होते, याचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार निशिकांत राऊत यांनी पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
विदेशी बनावटीची एक पिस्तुल जप्त : याबाबतची माहिती अशी की, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर लोहमार्ग पोलीस पुणे रेल्वे स्टेशनवर बंदोबस्त करीत असताना एक जण घाईघाईत प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरुन संशयास्पदरित्या जात असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्याच्या कोटाच्या खिशात मेड इन इंग्लंडचे विदेशी बनावटीचे एक पिस्तुल व ६ काडतुसे आढळून आली. त्याच्या गळ्यात सोनसाखळी, त्यात सूर्याचे आकाराचे व सूर्याचे चित्र असलेले पेंडण सापडले. ब्रेसलेट, लॅपटॉप असा ३ लाख ५५ हजार ३९० रुपयांचा ऐवज आढळून आला. पोलिसांनी तो जप्त केला आहे. कपड्याचे व्यापारी असल्याचा त्याने दावा केला आहे. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हे पिस्तुल मध्यप्रदेशातील भोपाळ येथे शर्मा नावाच्या व्यक्तीने दिल्याचे सांगत आहे. तो नागपूरला जात होता.
संशयित आरोपी नागपूरकडे जात होता : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक व राज्य शासनाच्या जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती, प्रचार आणि प्रसार समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या ८ दिवसांपासून नागपूरमध्ये वाद सुरु आहे. श्याम मानव यांनी तशी पोलिसांकडे तक्रारही दिली होती. अटक करण्यात आलेला व्यक्ती हा नागपूरला निघाला होता. श्याम मानव यांना ज्या धमक्या आल्या, त्याबाबत लोहमार्ग पोलीस त्याच्याकडे चौकशी करत आहेत. दरम्यान, याबाबत लोहमार्ग पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे चौकशी करता त्यांनी यावर अधिक काही बोलण्यास नकार दिला.
गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी आल्याने पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. अलीकडेच नागपुरात धीरेंद्र महाराज यांच्याविरोधात मानव यांनी सभा घेतली होती. यात धीरेंद्र महाराज आमचे आव्हान स्वीकारताच पळून गेले, असे सांगताना, त्यांनी केलेले चमत्काराचे दावे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मानव यांनी केली होती.
