Online Betting On Cricket : आयटी हब हिंजवडीमध्ये क्रिकेट सामन्यांवर ऑनलाइन बेटिंग; नऊ जणांना अटक

author img

By

Published : May 21, 2023, 7:53 PM IST

Online Betting On Cricket

पिंपरी, चिंचवडमध्ये आयपीएल क्रिकेट सामन्यांवर ऑनलाइन जुगार खेळणाऱ्या नऊ जणांना अनैतिक मानवी वाहतूक विभागाने अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून 4 लाख 81 हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. यामध्ये दोन लॅपटॉप आणि तेरा मोबाईलचा समावेश आहे.

ऑनलाइन बेटिंग करणाऱ्या नऊ जणांना अटक

पुणे : पिंपरी, चिंचवडमध्ये आयपीएल क्रिकेट सामन्यांवर जुगार खेळणाऱ्या नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 4 लाख 81 हजार रुपये जप्त केले आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे. लखनौ सुपर जायंट्स, कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील क्रिकेट सामन्यावर आरोपी सट्टा लावत होते.

आयपीएलवर देशभरात सट्टेबाजी : देशभरात आयपीएल क्रिकेटचे सामने पाहिले जात असून, सट्टेबाजीही मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे समोर आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सट्टा लावणारे, ऑनलाइन सट्टा खेळणारे या दोघांवरही कारवाई करण्यात येत आहे. शहरातील अनैतिक मानवी वाहतूक विभागाला हिंजवडी परिसरातील मारुंजी येथे लखनौ सुपर जॉइंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा लावत असल्याची माहिती मिळाली होती. यात वैभव बाबा राम डिक्कर इतर काही व्यक्ती ऑनलाइन सट्टा लावल्या प्रकरणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी आवळल्या नऊ जणांच्या मुसक्या : या प्रकरणी पोलिसांनी आरोपींकडून दोन लॅपटॉप, 4 लाख 81 हजार किमतीचे तेरा मोबाईल जप्त केले आहेत. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक प्रदिपसिंह सिसोदे, पोलिस उपनिरीक्षक विजय कांबळे, पोलिस निरीक्षक सुनील शिरसाट, गणेश करोटे, वैष्णवी गावडे, नागेश माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी सापळा रजून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

आयपीएल मॅचसाठी क्रिकेट बॅटिंग : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा येथील साईबाबा नगर येथील धनश्री सिग्नेचर सोसायटीमध्ये असलेल्या एका बंद फ्लॅटमध्ये आयपीएल मॅचसाठी क्रिकेट बॅटिंग सुरू असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वसीम हनिफ शेख, इकरामा मकसूद मुल्ला, मुसबीत मेहमूद बशैब हे तिघे मोबाईलवर ऑनलाईन क्रिकेट खेळत असल्याचे आढळून आले. या छाप्यामध्ये ५ मोबाईल, १ लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. तसेच गुन्हा दाखल करण्यात आला. कोंढवा पोलीस स्टेशन क्र. 519/2023 अन्वये 420, 34 आयपीसी, जुगार प्रतिबंधक कायदा 4(अ) 5, भारतीय टेलिग्राफ कायदा 25(क) अंर्तगत पुढील तपास पोलीस करीत आहेत.

हेही वाचा -

  1. BMC Election : 'मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना ५० चा आकडाही पार करू शकणार नाही'
  2. Arvind Kejriwal : केजरीवाल मुंबईत घेणार शरद पवार, उद्धव ठाकरेंची भेट, केंद्राच्या 'या' अध्यादेशाविरोधात समर्थन मागणार
  3. Pandharpur Vari : पंढरपूर वारीची शंभर वर्षांपासून परंपरा; अमरावतीच्या नारायण गुरु मठातून 1924 पासून निघते पालखी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.