Balashaheb Thakre Jayanti : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जे काही राजकारण होत आहे ते दुर्दैवी - सुप्रिया सुळे

author img

By

Published : Jan 23, 2023, 3:21 PM IST

supriya sule

हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांनी अजित पवार यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेत त्याच्यावर टिका केली आहे. यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या की समाजात जे नाणे चालते त्यालाच टारगेट केले जातेे. पवार कुटुंबियांवर टीका केली की बातमी होते. म्हणून ते आमच्यावर टीका करतात असे यावेळी सुळे यांनी सांगितले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जे काही राजकारण होत आहे ते दुर्दैवी - सुप्रिया सुळे

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यातील कात्रज चौक येथे उभारण्यात येणाऱ्या कामाची पाहणी केली. काल झालेल्या मोर्चाबाबत सुळे यांना यावेळी विचारले असता त्या म्हणाल्या की जेव्हापासून भाजपचे सरकार आले आहे. तेव्हापासून मला अरुण जेटली यांची आठवण येते. ते नेहेमी म्हणायचे की समाजात जेव्हा ज्या काही चुकीच्या गोष्टी होतात तेव्हा तुम्ही दाखवणे बंद करा म्हणजे हे वागणे बंद करतील. त्यामुळे अनेकवेळा मला भाजपला सुषमाजी आणि अरुणजी यांचीच आठवण करून द्यावी लागते.


जयंतीनिमित्त जे काही राजकारण होत आहे ते दुर्दैवी : आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असून यावेळी सुळे म्हणाल्या की मी मनापासून बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करते. ठाकरे आणि पवार कुटुंबीयांचे पाच दशकापासून ऋणानुबंधाचे संबंध आहेत. आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जे काही राजकारण होत आहे ते दुर्दैवी आहे. बाळासाहेबांना ते आवडणार नाही. बाळासाहेब हयात असताना त्यांनी त्यांचा उत्तराधिकारी उद्धव ठाकरे यांना निवडले असताना देखील आज शिवसेना तोडण्याचा फोडण्याचा आणि त्रास देण्याचे काम होत आहे. याचा अर्थ असा की तुम्ही बाळासाहेबांच्या निर्णयाला विरोध करत आहात,असे यावेळी सुळे म्हणाल्या.


त्यांना जर ते अपमान चालत असेल तर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भारतीय जनता पहिला सातत्याने अपमान होत आहे का, यावर सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की त्यांना जर ते अपमान चालत असेल तर आपण काय म्हणायचे असेदेखील यावेळी सुळे म्हणाल्या. मागच्या आठवड्यात पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याशी कात्रज चौक येथील उड्डाणपुलाच्या बाबतीत चर्चा करण्यात आली आणि आज पाहणी केली. कुठेतरी समन्वय होत नसल्यामुळे कामाला उशीर होत आहे. तसेच सर्व कामे एकत्रित काढल्याने कोणताही प्लॅन बी तयार केलेला नाही. त्यामुळे सातत्याने कात्रज चौक येथे वाहतूक कोंडी होत आहे. कात्रज चौक ते नवले ब्रीजपर्यंत काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. पण या कात्रज चौकातील सर्वच कामे एकत्रित काढल्याने या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होताना पाहायला मिळत आहे. याचा प्रचंड त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहज करावा लागत आहे प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे. असे यावेळी सुळे यांनी सांगितले.

हेही वाचा : MP Supriya Sule केंद्र सरकारचे बीएमसी एफडीवर का लक्ष आहे पंतप्रधानांच्या मुंबई रॅलीनंतर सुप्रिया सुळेंचा सवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.