Radhakrishna Vikhe Patil News : हिंदुत्वाच्या विचारांशी फारकत घेतलेल्या नेत्याकडून महाराष्ट्राला अपेक्षा नाही- राधाकृष्ण विखे पाटील

author img

By

Published : Apr 3, 2023, 9:38 AM IST

Radhakrishna Vikhe Patil

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना कोरोना काळात घेतलेल्या ऑनलाईन बैठकावरून त्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. टीका करताना ते म्हणाले की, दोन अडीच वर्षे उद्धव ठाकरे घरात बसले होते. त्यानंतर फेसबूकवर त्यांना लोकांनी पाहिले. त्यांनी आता वज्रमूठ बांधली आहे.

एकमेकांच्या विरोधात या मुठीचा वापर होइल - मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

पुणे: महाविकास आघाडीची रविवारी संभाजीनगरमध्ये सभा झाली. या सभेत वज्रमुठ घेऊन ते तिघे एकत्र आलेले आहेत. काळाच्या ओघांमध्ये या वज्रमुठीचा वापर एकमेकांच्या विरोधात पाडण्यासाठी होऊ नये म्हणजे झालं, अशी खोचक टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. उद्धव ठाकरे दोन अडीच वर्षाच्या काळानंतर बाहेर पडले नाही. तर त्यांना लोक फेसबुकवरच भेटायचे. त्यामुळे त्या मुठीचा योग्य वापर व्हावा, अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.



बोलताना भान ठेवावे: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक विश्वव्यापी नेतृत्व आहे. मोदीच्या छत्रीच्या खाली उद्धव ठाकरे, शिवसेना मोठी झाली आहे. याचे भान त्यानी ठेवले पाहिजे. त्यांनी बोलताना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि भाजपबरोबर जुने नाते, याचे भान ठेवावे अशीही टीका सुद्धा राधाकृष्ण विखे पाटलांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. फार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या प्रभावाखाली येऊन स्वतःचे नुकसान करून घेऊ नये, असा सल्ला उद्धव ठाकरे यांना राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.




महाराष्ट्राला फार अपेक्षा नाही: भविष्यात शिवसेना-भाजप उद्धव ठाकरे याबाबत विचारे असता, एक तर उद्धव ठाकरे यांच्या हातात काही राहिले नाही. त्यांचे रिमोट कंट्रोल दुसरे आहेत. हिंदुत्वाच्या विचारांशी फारकत घेतलेल्या नेत्याकडून आता महाराष्ट्राला फार अपेक्षा नाही. मुख्यमंत्री असतानाच्या काळात त्यांच्या देवभक्ती आणि देशभक्ती करणाऱ्या लोकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून जास्त काही अपेक्षा नाही, अशी टीका विखे पाटलांनी दिली आहे. त्यांच्या पक्षाची झालेली वाताहात त्याच्यातून निघून गेलेली नेते त्यामुळे हा आक्रोश आहे. हिंदुत्ववादी सरकार आहे असे सुद्धा राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत.



सावरकरांचे राजकारण: सावरकरांना भारतरत्‍न द्यायचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. यथावकाश केंद्र सरकार त्यावर निर्णय घेईल. व्यक्तिदोषापोटी सावरकरांचे राजकारण केले जात आहे. उद्धव ठाकरे आता औरंग्याच्या समाधीवर जाऊन डोकं टेकणाऱ्याच्या सोबत आहेत. त्यामुळे हिंदुत्ववादी विचार त्यांनी सांगणे हे हास्यास्पद आहे, असे सुद्धा विखे पाटील म्हणाले.




ढोंगी बाबावर कारवाई: बागेश्वर बाबांबद्दल बोलताना हे ढोंगी बाबा आहेत. प्रसिद्धीसाठी काहीतरी करत आहेत. जे लाखो लोक पंढरपूरला जातात, शिर्डीला लाखो भाविक श्रद्धा जातात ते काय उगीच येतात का? ती आपल्या देवी शक्तीवरील श्रद्धा आहे. त्यामुळे साईबाबा मोठे आहेतच. पण हा ढोंगी बाबा आहे. अशा ढोंगी बाबांवर कारवाई केलीच पाहिजे.



दिलदार माणूस आपण गमावला: राधाकृष्ण विखे पाटील पुण्यात रविवारी दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यानंतर एक चांगला मित्र गमावल्याचे दुःख आहे. मी आणि ते एकदाच विधानभवनात गेलो होतो. त्यामुळे ते मला नेहमी मार्गदर्शन करायचे. वेगवेगळ्या पक्षात आम्ही होतो. एक दिलदार माणूस आपण गमावला अशी भावना राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

हेही वाचा: Vajramuth Sabha भाजपला सांगतो शेंडीजानव्याचे नाही तर राष्ट्रीयत्व हे आमचे हिंदूत्व उद्धव ठाकरे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.