Mobile Tower Dues : मोबाईल टॉवर चालकांकडून एवढी आहे थकबाकी; माहिती अधिकारातून धक्कादायक बाब उघड

author img

By

Published : Dec 7, 2022, 2:17 PM IST

Mobile Tower Dues

आपल्या मोबाईलमध्ये बसवण्यात आलेल्या एखाद्या कंपनीच्या सिमबाबत जर व्हॅलिडीटी संपली तर तो सिम लगेच बंद होतो.(SIM turns off immediately) मोबाईल टावर यांचे यावर्षीचे थकबाकी आकडा हा 18 कोटी इतका असून महापालिका हा थकबाकी कधी वसूल करणार की या मोबाईल कंपन्यांना अभय देणार हा प्रश्न उपस्थित राहत आहे. ( arrears be recovered or be bailed out )

पुणे : सर्वसामान्य नागरिकांनी कर भरला नाही की त्याच्यावर महापालिकेच्यावतीने कारवाई करण्यात येते. तसेच महापालिकेकडून विविध शकली योजना राबविल्या जातात. जर आपल्या मोबाईलमध्ये बसवण्यात आलेल्या एखाद्या कंपनीच्या सिमबाबत जर व्हॅलिडीटी संपली तर तो सिम लगेच बंद होतो.(SIM turns off immediately) पण शहरात बसवण्यात आलेल्या तब्बल 2900 मोबाईल टावर यांचे यावर्षीचे थकबाकी आकडा हा 18 कोटी इतका असून महापालिका हा थकबाकी कधी वसूल करणार की या मोबाईल कंपन्यांना अभय देणार ( arrears be recovered or be bailed out ) हा प्रश्न उपस्थित राहत आहे.

मोबाईल टावर यांचे यावर्षीचे थकबाकी


मोठ्या रकमेची वसुली महापालिका कशी करणार : पुणे शहरात शहरभर विविध कंपन्यांचे तब्बल 2900 हून अधिक मोबाईल टॉवर बसविण्यात आले आहे. या मोबाईल टावर कडून सन 2021 ते 22 या वर्षीच्या मिळकत कर 91 कोटी एवढं भरण्यात आले आहे तर तब्बल 1800 कोटी एवढे मिळकत कर अजूनही या कंपन्यांकडून करण्यात आलेला नाही. ही बाब माहिती अधिकार कार्यकर्ते तानाजी घोलप यांनी माहिती अधिकारातून उघडकीस आणली आहे. त्यामुळे आत्ता एवढ्या मोठ्या रकमेची वसुली महापालिका कशी करणार हे पाहणं देखील तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे.


लवकरात लवकर कर वसूल करावे : सर्वसामान्य नागरिकांनी मिळकत कर भरली नाही की त्यांच्यावर महापालिकेकडून कारवाई येते. तसेच जर कोणी कर भरण्यास उशीर केला तर त्याच्या इथ ढोल ताशा घेऊन जाऊन कर भरण्याबाबत सांगितल जात. पण अश्या या मोबाईल टॉवर कंपन्या ज्यांचे एका वर्षात तब्बल 18 कोटी एवढे कर भरलेले नाही त्याबाबत महापालिका काहीही निर्णय का घेत नाही. महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी या मोबाईल कंपन्यांकडून लवकरात लवकर कर वसूल करावे आणि ते शहराच्या विकास कामांसाठी वापरावा अशी मागणी देखील यावेळी घोलप यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.